Breaking
महाराष्ट्र

नारायणगाव स्थित धोलवड गावचे रहिवाशी श्री रतिलाल बाबेल सरांच्या घरगुती गणपती उत्सवा मध्ये संत देखावा पाण्यासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी.

जुन्नर तालुक्यातील धोलवड गावचे रहिवासी असणारे व नोकरीच्या निमित्ताने नारायणगाव या ठिकाणी स्थायिक झालेले प्रसिद्ध वक्ते प्रा. रतिलाल बाबेल व सौ. अक्षदा बाबेल यांनी घरगुती गणपती सजावटीच्या निमित्ताने संत दर्शन हा देखावा सादर केला असून पर्यावरण पूरक गणपती साजरे करण्याचे त्यांचे हे बारावे वर्ष आहे. महाराष्ट्र ही संतांची, शूरांची,वीरांची भूमी असून महाराष्ट्राच्या विविध प्रांतात अनेक संत होऊन गेले. संतांनी सामाजिक समता निर्माण केली. कर्मकांडात अडकलेल्या लोकांना खरी भक्ती काय हे संतांनी समजून सांगितले. आपले कर्म प्रामाणिकपणे करणे हीच देवाची पूजा आहे, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. अठरापगड जातीतील संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करून, बोली भाषेचे महत्व सांगून बोलीभाषा जतन व संवर्धनाचे काम केले. या संतांचे जन्म ठिकाण, जन्म दिनांक, समाधी दिनांक, समाधी ठिकाण, संतांच्या गुरूंविषयी माहिती, त्यांचे साहित्य लेखन, समाज प्रबोधनाचे केलेले कार्य यावर या देखाव्यातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असून दररोज सायंकाळी साडेसात वाजताच्या आरतीला विविध स्तरातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते गणरायाची आरती केली जात आहे. गणरायाची मूर्ती चांदीची असून, मूर्तीसाठी दरवर्षी खर्च केला जात नाही. मूर्ती खरेदीची रक्कम गरजू विद्यार्थ्याला दिली जाते. गणरायाचे विसर्जन पर्यावरण पूरक केले जात असून विसर्जनासाठी वापरलेले जल झाडांना घातले जाते. ज्या संतांची मूर्ती, प्रतिमा, त्यांचे ग्रंथ देखाव्यात सजविले आहे ते सर्व गणरायाच्या विसर्जनानंतर संतांविषयी आदर असणाऱ्या समाजातील व्यक्तींना भेट म्हणून देण्यात येतात. यावर्षीच्या "संत दर्शन "या देखाव्यात, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास स्वामी, संत गोरोबाकाका, संत सेना महाराज, संत नरहरी महाराज, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत निळोबाराय, संत बहिणाबाई यांच्या मूर्ती, प्रतिमा, ग्रंथ मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक संतांचा प्रसिद्ध अभंग A4 फोटो पेपर वर घेऊन सादरीकरण केले आहे. घरच्या गणपतीची सजावट पर्यावरण पूरक करीत असून दरवर्षी घरी वेगळ्या पद्धतीने सजावट केली जाते.गणपती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन: तथा 21 वनस्पतींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती सादर केली जाते. बाप्पा माझा विद्येचा राजा,एक वही एक पेन भेट योजना राबवली जाते. 3व्यसनमुक्ती बाबत जनजागृती केली जाते एक वही एक पेन उपक्रम तसेच वाचाल तर वाचाल ही संकल्पना साकारली जाते. प्रश्नमंजुषा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात. " जय जवान, जय विज्ञान व जय किसान" या संकल्पनेवर आधारित कारगिल युद्धातील काही शहिदांची माहिती, चांद्रयान2 माहिती, धवलक्रांती व हरित क्रांती याची माहिती अशा प्रकारच्या सजावटीचे प्रयोजन केलेले असून,यातून शेतकरी ,सैनिक व शास्त्रज्ञ यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 24 तीर्थ विषयी सविस्तर माहिती मांडून "आई विषयावरील कात्रण संग्रह" मांडून जनजागृती केली जाते. "भारतीय सण संस्कृती आणि परंपरा" : यात भारतातील सर्व सणांची माहिती, सचित्र व सर्व साहित्यासह मांडण्याचा प्रयत्न केला गेला. सन 2023 , युनोने हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर केले असून G20 शिखर परिषदेसाठी आलेल्या सर्व राष्ट्राध्यक्षांना भरडधान्याचे विविध पदार्थ करून खाऊ घातले. या धरतीवर महाराष्ट्राची खाद्य संस्कृती (अन्न हे पूर्ण ब्रम्ह )हा देखावा केला.देखाव्याला प्राप्त झालेले सन्मान : वाचाल तर वाचाल या थीम ला तालुक्यात प्रथम क्रमांक -सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, रु. 5001/ रोख बक्षीस. पंचमहाभुते फौंडेशन, यांचे वतीने राज्यस्तरीय पर्यावरण पूरक स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक -101 वनस्पती आणि प्रमाणपत्र देखील मिळाले आहे मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी नारायणगाव.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे