Breaking
ब्रेकिंग

* न्यूज 18 जनमत चैनल* *संपादकीय…* *धुळे व जळगांव जिल्ह्यातील* *गौण खनिज तस्करांचा माज !* *या राज्यात अवैध मद्य, गौण खनिज, गोवंश, गुटका, वाहतुकीची वाहने मुद्देमालासह पकडली जातात, गुन्हे देखील दाखल होतात. मुद्देमाल जप्त केला जातो, परंतू मुख्य आरोपी कधीच सापडत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायातील म्होरके अधिकार्‍यांना कधीच सापडत नाहीत. कारण महसूल विभाग पोलीस प्रशासनातील अधिकारीच भ्रष्ट असल्याने त्यांचेवर प्रतिहल्ला करण्याच्या घटना राज्यात वाढल्या असून भंडारा येथे एका वाळू तस्कराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.*

* न्यूज 18 जनमत चैनल *संपादकीय...* *धुळे व जळगां व जिल्ह्यातील* *गौण खनिज तस्करांचा माज !* *या राज्यात अवैध मद्य, गौण खनिज, गोवंश, गुटका, वाहतुकीची वाहने मुद्देमालासह पकडली जातात, गुन्हे देखील दाखल होतात. मुद्देमाल जप्त केला जातो, परंतू मुख्य आरोपी कधीच सापडत नाही. त्यामुळे अवैध व्यवसायातील म्होरके अधिकार्‍यांना कधीच सापडत नाहीत. कारण महसूल विभाग पोलीस प्रशासनातील अधिकारीच भ्रष्ट असल्याने त्यांचेवर प्रतिहल्ला करण्याच्या घटना राज्यात वाढल्या असून भंडारा येथे एका वाळू तस्कराची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.* अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करतांना अडविल्यांचा राग आल्याने महसूल पथकाशी हुज्जत घालत एकाने धुळे शहरातील देवपूर भागात दि.21 संप्टेबर रोजी महिला तलाठीच्या कानशिलात लगावली. परंतू जिल्ह्यातील महसूल विभागामध्ये खळबळ उडाली नाही. नेहमीच्या पध्दतीप्रमाणे कानशिलात लगावणार्‍यासह सर्व आरोपी पळून गेल्याने ट्रॅक्टर-ट्राली व गौण खनिज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशाच प्रकारची घटना जळगांवचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांच्या शासकीय निवासस्थानी जावून वाळूमाफीया भूषण सपकाळे याने दिलेली धमकी या दोन्ही घटना महसूल विभागाच्या भ्रष्टाचारावर प्रश्न चिन्ह उभ्या करणार्‍या आहेत. मागील महिन्यात भुसावळ येथे व यावल-साखळी जवळ अशाच प्रकारची घटना घडली होती. जळगांव जिल्हयातील यावल तालुक्यात संपूर्ण मंडळामध्ये अवैध गौण खनिज वाहतुक सर्रासपणे खुलेआम सुरु आहे. या अवैध खनिज वाहतुकीत सामाजिक-राजकीय लोकांचे हितसंबंध असल्याने नव नवीन शक्कल लढवून अवैध वाहतुक सुरु असते. यात महसूल विभागाचे कर्मचारी आणि पोलीस या दोन विभागातील अधिकार्‍यांचा संबंध येत असल्याने दोन्ही विभागातील अधिकार्‍यांची हात मिळवणी झालेली असते. अवैध गौण खनिज वाहतुकीची अनेक वाहने जप्त केली जातात परंतू ही वाहने वेगवेगळ्या पध्दतीने आर्थिक देवाण-घेवाण करुन सोडून दिले जातात. यात, मंडळ अधिकारी, तहसिलदार, तलाठी, यांना मोठया प्रमाणावर मलिदा दिला जातो. राज्यातील महसूल विभागातील पुरवठा विभाग, गौण खनिज विभागातील अधिकार्‍यांवर आणि तहसीलदारांवर ईडीची कारवाई करायला हवी. तेव्हा सरकारच्या लक्ष्यात येईल की खरे ‘भामटे’ तर प्रशासनातील खुर्च्यांवरच बसले आहेत. सर्वात भ्रष्ट हा तहसीलदार असतो. अपवाद वगळता राज्यातील बहुतांश तहसीलदार हे मालामाल आहेत. मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या संगनमताने राज्यातील अवैध गौणखनिज वाहतूक मोठया प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही शहरात किंवा तालुक्याच्या ठिकाणी वाळूची वाहने पकडली गेली तरी त्यातील प्रमुख म्होरक्या कधीच सापडत नाही. तो तहसीलदार आणि त्या भागातील पोलीस ठाण्याच्या पीआय यांचा खास मित्र असतो. यावर खरेतर पोलीस अधक्षिक आणि जिल्हाधिकारी यांचे लक्ष असायला हवे. परंतू राज्यात कागदी घोडे ज्या पध्दतीने पळविले जातात त्या पध्दतीत मुख्य गुन्हेगार कधीच सापडत नाही. खरेतर धुळे शहरातील देवपूर भागात रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतुक करणार्‍याने महिला तलाठीच्या कानशिलात वाजविल्यानंतर धुळे जिल्हयातील महसूल विभागात खळबळ उडायला हवी होती. 21 सप्टेंबरच्या या घटनेनंतर जिल्हाभर अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांची धरपकड व्हायला हवी होती. शेकडो ट्रॅक्टर आणि डंपरच्या रांगा तहसिल कार्यालयामध्ये लागायला हव्या होत्या. परंतू “थप्पड की गुंज”चा आवाज कुठे आलाच नाही. ट्रॅक्टर ट्राली जप्त करुन ते जमा करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले. विशेष म्हणजे आठ दिवसाच्या आत हे ट्रॅक्टर मुळ मालकाच्या घरी पोहचलेले असेल यात शंका नाही. एका महिला तलाठीच्या कानशिलात वाजविण्यापर्यंत महिला तहसीलदारच्या अंगावर ट्रॅक्टर चालविण्यापर्यन्त, वाहने पळून नेली जातात. परंतू जिल्हाधिकारी काहीही अ‍ॅक्शन घेत नाही. जिल्हाधिकार्‍यांचे अधिकार काय असतात हेच सामान्य नागरिकांना माहित नसल्याने सर्वत्र आलबेल सुरु आहे. जळगावचे प्रांत महेश सुधाळकर यांचेकडे एक माफिया शासकीय निवासस्थानात जावून धमकी देतो याचा अर्थ धुळे जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील वाळू तस्करांना किती माज आला आहे याची साक्ष पटते. जळगाव प्रांत यांचेकडे प्रलंबित असलेल्या हद्दपारीच्या शंभराचे वर केसेस आहेत, ते गुन्हेगार अद्यापही हद्दपार का केले नाहीत, त्यांची एव्हढी दहशत अधिकार्‍यांवर आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. धुळे जळगांव जिल्हयातील वाळू नाशिक, ठाणे, मुंबई पर्यन्त रातोरात जाते. मग या महामार्गावर यांना पकडणारी कोणतीच महसूल यत्रंंणा-पोलीस यंत्रणा नाही का? तर सर्व यंत्रणा जागेवर असते. सर्व अवैध गौण खनिज वाहतूकदारांजवळ वाकीटॉकी असतात. ते रस्त्यावर चालणार्‍या सर्व भरलेल्या वाहनांना खरब करतात. वाहने जागेवरच थांबविली जातात कारण मोठे अधिकारी आज रस्त्यावर या-या ठिकाणी उभे आहेत असे महसूल कार्यालयातील दलाल कर्मचारी, पोलीस विभागातील भ्रष्ट पोलिसच या अवैध वाहतुकदारांना सूचना देत असतात. धुळे जिल्हयात शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुका तर जळगांव जिल्हयातील यावल तालुक्यातील यावल, बारेावल, भालशिव, प्रिंपी, डांगर्णी, किनगांव शिरसाड, साकळी, मनवेल, थोरगव्हाण,दहीगांव डोंगर कठोरा, फैजपूर,न्हावी, हिंगोणा, हंबर्डी याठिकाणी तर भुसावळ तालुक्यात वराडसीम, साकेगाव, बोहर्डी, हतनूर, काहुरखेडा, मानपूर या गांवामधून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतू होत असते. प्रशासनाला या सर्व गावांची माहिती असतांना सुध्दा लाखो रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण बारा महिने होत असते. कारण गेल्या दोन दशकात लहान-लहान गांवापासून तर महानगरांपर्यन्त टोलेजंग घरे, इमारती उभ्या रहात आहेत. मग त्यांना रेती मिळते म्हणूनच ही बांधकामे सुरु आहे. यात स्टोन क्रेशर चालक-मालक सुध्दा गौण खनिजाचे वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात उत्खनन करतात. महसूल विभागात नाममात्र रॉयल्टी भरली जाते. रेती साठयांचे लिलाव झाले तरी 50 डंम्परची रायल्टी भरली जाते आणि 500 डंपर भरुन नेली जातात. भाडयाची वाहने लावली जातात, डुल्पीकेट एकाच क्रमाकांच्या पावत्या छापल्या जातात. धुळे आणि जळगांव जिल्हयातील ही अवैध गौण खनिज वाहतूक मोठ-मोठया तस्करांच्या मालकीची आहे. परंतू या तस्करांपर्यन्त महसूल विभागाचे, पोलीस प्रशासनातले अधिकारी पोहचू शकत नाही. कारण ते पांढरे कपडे घालून त्यांच्याच कार्यालयात बसलेले असतात. ‘मग न खाऊँगा न खाने दूूगाँ चे काय’? परंतू हे असेच सुरु राहणार आज महिला कर्मचार्‍याच्या कानशिलात लागावली तरी त्या ‘थप्पडची गुंज’ प्रशासनाला ‘ऐकू’ आली नाही का ? तूर्तास एव्हढेच.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे