Breaking
ब्रेकिंग

युवक हे महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा—विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर.

युवक महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील दुवा—विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर अलिबाग:- महसूल विभागामार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. या योजनोंच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे. महसूल प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यामधील युवकांनी दुवा म्हणून काम करावे. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले. पनवेल येथील सी.के.टी. महाविदयालय येथे 'युवा संवाद' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याहस्ते व जिल्हाधिकारी रायगड डॉ. श्री. योगेश म्हसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ५ नवमतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सी. के. टी. कॉलेजमधील १० विदयार्थ्यांची महसूल दुत म्हणून निवड करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी पनवेल राहुल मुंडके, प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, तहसिलदार पनवेल विजय पाटील उपस्थित होते. युवक हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे महसूल विभागाचे त्यांचेसमवेत असलेले नाते दृढ होण्याच्या दृष्टीकोनातून युवकांशी सकारात्मक संवाद साधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महसूल सप्ताहात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना शासकीय योजनांकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले आणि इतर महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा लाभ सहजरित्या मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात येत आहेत. या महसूल दूतांनी शासन व जनता यामधील दुवा बनून शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्यात असे विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले. तसेच महसूल दूत मागची संकल्पना विषद केली. जास्तीत जास्त युवकांनी महसूल दूत बनून शासन व जनता यामधील दुवा बनावे. तसेच अवगत असलेल्या नविन टेक्नॉलॉजीचा वापर करुन शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे आवाहन केले. आपत्तीमध्ये युवकांचा सहभाग महत्वाचा—जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे जिल्हाधिकारी डॉ. श्री. योगेश म्हसे यांनी युवकांशी थेट संवाद साधून त्यांना महसूल विभागातील असलेल्या उणिवा दूर करण्याकरीता काय बदल करणे अपेक्षित आहे तसेच महसूल विभागाकडून युवकांच्या असलेल्या अपेक्षा यावर संवाद साधला. तसेच महसूल विभागाची रचना व कार्यपध्दती याबाबत माहिती दिली. महसूल विभागामार्फत पुरविण्यात येणा-या ऑनलाईन सेवा ई-हक्क, ई-म्युटेशन, ई-पिक पाहणी इ.बाबत माहिती देऊन त्यांचे महत्व पटवून दिले. रायगड जिल्हयात भौगोलिक परीस्थितीनुसार येणा-या संभाव्य आपत्तीमध्ये युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी आपत्ती विषयक प्रशिक्षण घेवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ.म्हसे यांनी यावेळी केले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आलेल्या नवनियुक्त अधिका-यांनी स्पर्धा परीक्षाबाबत माहिती देवून युवकांशी संवाद साधला.तहसिलदार कार्यालय पनवेल मार्फत यावेळी नवमतदार नोंदणी व मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले व त्याठिकाणी २०० नवमतदारांची नोंदणी करण्यात आली. यावेळी महसूल विभागामार्फत वाटप करण्यात येणा-या विविध दाखल्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती देणाऱ्या पत्रकांचे वाटप करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे. मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत चैनल.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे