Breaking
ब्रेकिंग

शेतकरी व कामगारांसाठी हेच का अच्छे दिन?

*🫵 शेतकरी व कामगारांसाठी हेच का " अच्छे दिन "...?* कोणत्याही देशाची प्रगती ही शेतात राबणारे शेतकरी आणि कारखान्यात राबणारे कामगार यांच्यावर अवलंबून असते. राष्ट्राच्या प्रगतीची ही दोन चाके आहेत. कारण प्रत्यक्ष ग्राऊंड लेवलवर काम करणारा हा कष्टकरी वर्ग आहे. परंतू आज देशातील शेतकरी व कामगार शासकीय विरोधी धोरणांमुळे आणि मुस्कटदाबीपुढे हतबल झाला असून उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देशातील शेतकऱ्यांविरूध्द धोरणं राबवून शेतमालाची पार माती करून टाकली आहे. केवळ शहरी भागातील मतदारांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली जात आहे. कांदा, साखर, तांदूळासह इतर शेतमालावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले जात आहे. देशांतर्गत भरपूर कापसाचे उत्पादन असताना कापसाच्या गाठी आयात करण्यात येत आहेत. सोयाबीनचे बाजारभाव दबावातच ठेवण्यासाठी विक्रमी खाद्यतेल आयात केले जात आहे. इतरही शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत आहे. हमीभावा पेक्षा कमी दर दिल्याबद्दल किती व्यापाऱ्यांवर या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे...?. व्यापारी धोरणं राबवून शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सरकार सोडत नाही. जीवतोडून शेतकरी करत असलेल्या न्याय्य आंदोलनांकडे काणाडोळा करून चिरडून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. परिस्थितीपुढे हतबल झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे व्यापारी सरकार असून देशातील शेतकऱ्यांना व कामगारांना उध्वस्त करायला पहात आहे. जी गोष्ट शेतकऱ्यांबाबत, तसेच धोरण देशातील कामगारांविरोधी राबवण्याचा सपाटा चालू आहे. कामगारांनी कष्टाच्या पगारातून प्राॅव्हिडंट पेन्शन फंडात रक्कम जमा केलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर दैनंदिन आणि वैद्यकीय गरजा पेन्शनवर भागतील या भावनेतून त्यावेळी या सरकारी योजनेला कामगार संघटनांकडून विरोध केला नाही. परंतू महिन्याला फक्त हजार दोन हजार रुपये EPS-95 पेन्शनवर देशातील कामगारांची बोळवण करण्यात येत आहे. आज कामगारांचे कोट्यावधी रुपये पेन्शन फंडात जमा असताना हक्काच्या पेन्शनसाठी जेष्ठ नागरिक कामगारांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असेल ही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. देशाचा अन्नदाता, रात्रंदिवस शेतात राबणारा शेतकरी. तसेच देशाला गतिमान ठेवण्यासाठी बाराही महिने कष्ट करणारा कामगार. यांना जर रस्त्यावर उतरून स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही मोठी शोकांतिका असून राज्यकर्त्यांचे अपयश आहे. देशातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना हेच 'अच्छे दिन ' दाखवायचे होते का....???. असा प्रश्न निर्माण झाला आहे.*🫵 शेतकरी व कामगारांसाठी हेच का " अच्छे दिन "...?* कोणत्याही देशाची प्रगती ही शेतात राबणारे शेतकरी आणि कारखान्यात राबणारे कामगार यांच्यावर अवलंबून असते. राष्ट्राच्या प्रगतीची ही दोन चाके आहेत. कारण प्रत्यक्ष ग्राऊंड लेवलवर काम करणारा हा कष्टकरी वर्ग आहे. परंतू आज देशातील शेतकरी व कामगार शासकीय विरोधी धोरणांमुळे आणि मुस्कटदाबीपुढे हतबल झाला असून उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. देशातील शेतकऱ्यांविरूध्द धोरणं राबवून शेतमालाची पार माती करून टाकली आहे. केवळ शहरी भागातील मतदारांना खूष करण्यासाठी शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली जात आहे. कांदा, साखर, तांदूळासह इतर शेतमालावर निर्यात बंदी लादून शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलले जात आहे. देशांतर्गत भरपूर कापसाचे उत्पादन असताना कापसाच्या गाठी आयात करण्यात येत आहेत. सोयाबीनचे बाजारभाव दबावातच ठेवण्यासाठी विक्रमी खाद्यतेल आयात केले जात आहे. इतरही शेतमाल हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत आहे. हमीभावा पेक्षा कमी दर दिल्याबद्दल किती व्यापाऱ्यांवर या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे...?. व्यापारी धोरणं राबवून शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सरकार सोडत नाही. जीवतोडून शेतकरी करत असलेल्या न्याय्य आंदोलनांकडे काणाडोळा करून चिरडून टाकण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. परिस्थितीपुढे हतबल झाल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे व्यापारी सरकार असून देशातील शेतकऱ्यांना व कामगारांना उध्वस्त करायला पहात आहे. जी गोष्ट शेतकऱ्यांबाबत, तसेच धोरण देशातील कामगारांविरोधी राबवण्याचा सपाटा चालू आहे. कामगारांनी कष्टाच्या पगारातून प्राॅव्हिडंट पेन्शन फंडात रक्कम जमा केलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर दैनंदिन आणि वैद्यकीय गरजा पेन्शनवर भागतील या भावनेतून त्यावेळी या सरकारी योजनेला कामगार संघटनांकडून विरोध केला नाही. परंतू महिन्याला फक्त हजार दोन हजार रुपये EPS-95 पेन्शनवर देशातील कामगारांची बोळवण करण्यात येत आहे. आज कामगारांचे कोट्यावधी रुपये पेन्शन फंडात जमा असताना हक्काच्या पेन्शनसाठी जेष्ठ नागरिक कामगारांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागत असेल ही राज्यकर्त्यांसाठी लाजिरवाणी बाब आहे. देशाचा अन्नदाता, रात्रंदिवस शेतात राबणारा शेतकरी. तसेच देशाला गतिमान ठेवण्यासाठी बाराही महिने कष्ट करणारा कामगार. यांना जर रस्त्यावर उतरून स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही मोठी शोकांतिका असून राज्यकर्त्यांचे अपयश आहे. देशातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना हेच 'अच्छे दिन ' दाखवायचे होते का....???. असा प्रश्न निर्माण झाला आहे.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे