Breaking
ब्रेकिंग

देवनार पोलीस ठाणे अंतर्गत सळई माफिया इम्रान चौधरी मीकाईल अन्सारी, अब्दुल हमीद आणि अमरसिंह यांच्यामार्फत चालवण्या जाणाऱ्या अवैध धंद्यांवर वरदहस्त कोणाचा?

देवनार पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक १८९/२०२४,कलम ४०७,४११,३४ नुसार आरोपी इसम इम्रान चौधरी,मिकाइल अन्सारी,अब्दुल हमीद,अमर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी एपीआय घाडगे पोलीस तपास करीत आहे.आरोपी जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा तोच तोच गुन्हा सुरू केला आहे. देवनार पोलीस ठाणे हद्दीत घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड,उड्डाणपूल आरसीसी पिल्लर नं १८/१९,जय महाराष्ट्र ट्रेंडिंग कंपनी जय महाराष्ट्र कंपाऊंड मधील मोकळ्या जागेत पहाटे ३ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मोठ्याप्रमाणात ट्रक, ट्रेलर, लॉरी, टेम्पोमधून ठराविक वजनानुसार स्टील प्लेट,चॅनल, अँगल, पत्रा, रॉडस, टिएमटी बार आदी किंमती मालमत्तेचे अपहार ड्रायव्हरच्या आर्थिक संगनमताने करीत आहे. रोज चोरण्यात अथवा अपहार केलेल्या किंमती मालमत्ता जडवाहनात भरून कुर्ला येथील जरीमरी स्थित माफिया इम्रान चौधरी याचा बंधू कलाम चौधरी याच्या दुकाच्या गोडावून मध्ये ठेवण्यात येतो.कलाम चौधरी स्वतः च्या मालकीच्या स्टील ट्रेडिंग आस्थापना च्या माध्यमातून बोगस,बनावट आणि खोट्या बिलाद्वारे किंमती मालमत्ता विक्री करीत केंद्र व राज्य सरकारच्या महसुलांची चोरी बिनदिक्कतपणे करीत आहे. काही वर्षांपासून देवनार पोलीस ठाणे हद्दीत जय महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी जय महाराष्ट्र कंपाऊंड च्या मोकळ्या जागेत पहाटे ते सकाळ पर्यंत कोणासही स्टील चोरीच्या अड्ड्याचा थांगपत्ता लागत नाही. जय महाराष्ट्र कंपाऊंडच्या प्रवेशद्वारा जवळ जडवाहने येणे- जाण्यासाठी मोकळे जागा रस्त्यावर सोडून आजूबाजूला मोठ्याप्रमाणात कचरा उचलण्याचे वाहने पार्किंग केली जात आहे. परिणामी सदर ठिकाणी मोठ्याप्रमाणात स्टील स्टील प्लेट,चॅनल, अँगल, पत्रा, रॉडस, टिएमटी बार आदी किंमती मालमत्तेची चोरी करण्यात येत असल्याने रोज लाखों रुपयांची काळी कमाई माफिया इम्रान चौधरी, कलाम चौधरी,अब्दुल रहीम उर्फ सोनू,अब्दुल हमीद आणि त्यांचे साथीदार करीत आहेत.अवैध धंद्याला आणि माफियांच्या टोळीला देवनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदत,प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि संरक्षण बिनधास्तपणे देत असून त्याबदल्यात प्रॉटेक्शन मनी माफियाच्या टोळी कडून प्रति ठराविक लाखों रुपयांची लाच घेत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या दुसऱ्याच्या मालमत्तेची चोरी,अपहाराला चालना दिली जात आहे. संबंधित प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून भ्रष्ट अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून अवैध स्टील चोरीचा धंदा आणि माफियांच्या टोळीला नेस्तनाबूत करावे कायदा- सुव्यवस्था अबाधित राखावा अन्यथा भ्रष्टाचारात लिप्त पोलीस परिमंडळ ६ कार्यक्षेत्रातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अवैध धंदा आणि स्टील चोरी करणाऱ्या टोळीचे उच्चाटन केले नाही तर त्रयस्थ गठीत पोलिस अधिकाऱ्यांचे पथकाद्वारे अवैध धंद्या व माफियांची दंडेलशाही आणि भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांची पोलखोल उघडकीस आणून कायदा- सुव्यवस्था जनहितार्थसाठी अबाधित ठेवावी.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे