Breaking
गुन्हेगारी

भर सभेमध्ये वाल्मीक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पान देखील हलत नाही अशा बोलणाऱ्या पंकजा मुंडे हा वाल्मीक कराड आहे तरी कोण? एक सिरीयल किलर ,गावगुंड की सुपारी घेणारा सुपारी बहाद्दर याचे उत्तर पंकजा मुंडे देतील का?

बीड प्रतिनिधी:जितेंद्र आव्हाडांच्या कालच्या हिवाळी अधिवेशन मधील मधील कालच्या भाषणानंतर जे काही जितेंद्र आव्हाड साहेबांना फोन आले; त्यातील ९९% फोन हे त्यांचे समर्थन करणारे होते असे जितेंद्र आवड सांगतात. पण, महाराष्ट्रात जाती-पातीच्या भिंती किती प्रबळपणे उभारल्या गेल्यात हे प्रत्येक फोनमधून ध्वनित होत होते असे त्यांनी ट्विट करून सांगितले. त्यात ते म्हणतात एक वाक्य मला खूपच खटकले, "साहेब, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात." मी माझ्या भाषणातच सांगितले होते की, ' मी वंजारी आहे. मी वाल्मिक कराडच्या विरोधात बोलतोय. तो पण वंजारीच आहे. शाहू, फुले,आंबेडकर यांचा विचार आहे. जिथे अन्याय- अत्याचार होतो त्याविरोधात उभे ठाकलेच पाहिजे.अन्याय करणाऱ्याला जात नसते आणि ज्याच्यावर अन्याय होतो, त्यालाही जात नसते आणि अन्यायाविरूद्ध बोलणाऱ्यानेही जात तपासू नये. जितेंद्र आव्हाडांनी भुसावळच्या प्रकरणात मणियार चाचाची बाजू घेतली. तेव्हा अनेकांनी त्यांचे कौतूक केले आणि अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. पण त्यावेळेस आव्हाडांनी भूमिका स्पष्ट केली की, जर मणियार चाचाच्या जागी माझा माझा बा असता तर मी काय केले असते? किंवा तुम्ही काय केले असते? तिथे धर्म आड आला. अनेकवेळा मी दीन-दलित, शोषित- पीडितांची बाजू घेत असतो. तेव्हाही जातीपातीचे राजकारण आड येत असते. वर्षानुवर्ष ज्या समाजावर अन्याय होत असतो त्या समाजासाठी आपण बोललेच पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांतूनच येते. शोषक हा वेगळा आणि शोषित हा वेगळा समाज आहे.आपण कुठल्याही समाजाचे असू पण शोषितांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे हीच महाराष्ट्राच्या मातीची कायम शिकवण आहे.अन् ही शिकवण मी तरी कधी विसरणार नाही. आणि ते अधिवेशनातील भाषणाच्या वेळेच्या मर्यादेमुळे असं देखील म्हणतात की मी जे काल बोलायला विसरलो ते खाली लिहितोय.. वाल्मिक कराड चप्पल का घालत नाही? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राने जरूर विचारावे. २०० च्या वर एफआयआर नोंदवणारा वाल्मिक कराड हा एफआयआर नोंदवायला पोलीस स्टेशनला किती वाजता जातो की पोलीस त्याच्या घरी येऊन सह्या घेतात? याची माहिती महाराष्ट्राला मिळाली पाहिजे.प्राजक्ता धस या भगिनीवर अन्याय होतो. न्याय मिळविण्यासाठी त्या वेगवेगळे दरवाजे ठोठावतात.आजही त्या प्राजक्ता धस यांना न्याय मिळत नाही. त्यांना न्याय कोण देणार?आणखी खूप प्रश्न आहेत. बीडमधील खुनांची मालिका ही एखाद्या सिरियल किलरने केलेल्या खुनांप्रमाणे आहे. एखाद्या पुस्तकात जे आपण वाचले असते की, एकाने ४० खून केले; ५० खून केले, नंतर ते उघडकीस आले. असाच एक सिरियल किलर आपणाला ठेचायचा आहे अन् त्या सिरियल किलरचे नाव आहे, वाल्मिक कराड.... फक्त आणि फक्त वाल्मीक कराड...! याच्यावर वरदहस्त कोणाचा? मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी डिजिटल युगाचे डिजिटल बातमीपत्र.

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे