Breaking
ब्रेकिंग

मुंबई महानगरपालिकेच्या कल्पवृक्षावर वाढत आहेत भ्रष्टाचाराची बांडगुळे.

अंधेरी स्थित एका इमारतीवरील दोन अनधिकृत मजल्यांवर कारवाई न करण्यासाठी दोन कोटी रुपये लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी 75 लाख रुपये आपल्या हस्तकाद्वारे स्वीकारणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभागातील पदनिर्देशित अधिकारी नामे मंदार अशोक तारी या पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करताना 75 लाख रुपये स्वीकारणाऱ्या महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या दोन हस्तकांना रंगेहात अटक केली.के पूर्व विभागामध्ये मध्ये मंदार अशोक तरी हा अधिकारी कार्यरत असून त्याच्या अधिकार क्षेत्रातील एका इमारतीमध्ये दोन मजले अनधिकृत असून त्या मजल्यावर निष्काक्षणाची कारवाई चे आदेश झाले असताना त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई न होण्यासाठी अधिकाऱ्याने दोन करोड रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.परंतु तक्रारदाराला अधिकाऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे दिनांक 31/7/2024 रोजी मंदार तारी पदनिर्देशित अधिकारी के पूर्व विभाग यांच्या विरोधात समक्ष उभे राहून तक्रार दिली. तक्रारदाराच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 06 /08/ 2024 रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे बांधकाम केलेल्या अनधिकृत इमारतीवर निष्काशनाची कारवाई होऊ नये म्हणून रुपये दोन करोड लाचेची मागणी करून त्यापैकी रुपये 75 लाख पहिला हप्ता लोकसेवक यांनी त्यांच्या दोन हस्तकाद्वारे स्वीकारण्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार पंचासमक्ष तात्काळ करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान लोकसेवक यांच्या सांगण्याप्रमाणे पदनिर्देशित अधिकारी यांचे खाजगी हस्तक नामे मोहम्मद शेहजादा वय वर्ष 33 आणि प्रतीक पिसे वय वर्ष ते 35 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी रुपये 75 लाख स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.म्हणून लोकसेवक मंदार अशोक तारी पदनिर्देशित अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका के पूर्व विभाग कार्यालय आणि त्यांचे दोन खाजगी इसम यांच्या विरोधात लासलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई येथे भ्र.प्र. अधिनियम 1988 कलम 7,7 अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगाराच्या नोकऱ्या असताना देखील आपल्या अधिकाराचा गैरवापर करून भ्रष्टाचाराच्या माध्यमातून बेहिशोबी संपत्ती कमवत असतात.दोन करोड रुपये सर्वसामान्य माणसाला कमविण्यासाठी उभी हयात घालवावी लागते.परंतु असे भ्रष्ट अधिकारी दोन करोड रुपये दोन-तीन फोनवर कमवू शकतात.हे साधं एक उदाहरण आहे जे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्तव्यदक्ष अधिकारी माननीय संदीप दिवाण अप्पर पोलीस आयुक्त आणि माननीय श्री राजेंद्र सांगळे अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मंदार तारी सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला समाजापुढे यावे लागले.अन्यथा मंदार तारी सारखे भ्रष्ट अधिकारी मुंबई महानगरपालिकेत कित्येक असतील कारण मुंबई महानगरपालिका म्हणजे जणू काही अलिबाबाची गुहाच आहे. मुंबई महानगरपालिकेतील 24 वॉर्ड मध्ये हे भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून गडगंज पगार असताना देखील टॅक्स पेयर जनतेला अक्षरशः लुटत आहेत.मुंबई महानगरपालिकेमध्ये बिल्डिंग अँड फॅक्टरी डिपार्टमेंट बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट, एस डब्ल्यू डी, डिपार्टमेंट एस डब्ल्यू एम डिपार्टमेंट, हायड्रोलिक डिपार्टमेंट, रोड्स अँड ब्रिजेस डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट, ट्रेचेस डिपार्टमेंट, गार्डन डिपार्टमेंट इत्यादींच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी च्या निविदा प्रत्येक वर्षी मुंबई महानगरपालिकेमधून निघत असतात.या निविदांचा अभ्यास केला असता कित्येक निविदा रेगुलर कॉन्ट्रॅक्टर्सच्या वाट्याला कशा जातात हे मोठे प्रश्नचिन्ह? आणि ह्या प्रश्नप्रश्नाचे उत्तर जर शोधावयाचा जर प्रयत्न केला तर फक्त आणि फक्त उत्तर एकच येईल ते म्हणजे भ्रष्टाचार! भ्रष्टाचार..! आणि फक्त भ्रष्टाचार ...! मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी मुंबई.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे