Breaking
ब्रेकिंग

मनपा आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी ज्याप्रकारे के पश्चिम इमारत व कारखाने विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली तशाच प्रकारे एच पूर्व इमारत व कारखाने विभागाचे डीओ स्वप्नाच्या शिरसागर व कनिष्ठ अभियंता सोनल आव्हाड यांच्यावर देखील कारवाई करणार का?

सांताक्रुज पूर्व प्रभाग क्रमांक 90 येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, वारंवार आरटीआय कार्यकर्ते तसेच पत्रकार आणि समाजसेवक यांनी वेळोवेळी तक्रार देऊन देखील काही अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई होत नसून अनाधिकृत बांधकामांच्या संरक्षणासाठी वरदहस्त कोणाकोणाचा? हा जनसामान्यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहत आहे. तसेच वेसावे येथील अनाधिकृत बांधकामनावर निष्काषणाची कारवाई करण्याचे वरिष्ठांचे आदेश असतानाही त्यांच्याकडे वारंवार दुर्लक्ष करणारे तसेच आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर राहिल्या कारणी दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी निलंबनाची कारवाही केली असून इमारत व कारखाने विभागाचे पदनिर्देशित अधिकारी स्वप्निल कोळेकर यांची बदली केली आहे.त्याचबरोबर वेसावे येथील अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली असून पालिकेच्या के पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक 59 आणि 63 मध्ये अनाधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात परस्पर फेरफार करणे तसेच सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन तसेच दलदलीच्या परिसरातील जमिनीवर अनधिकृत बांधकामे केल्या प्रकरणी पालिकेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या परिमंडळ चार चे सह आयुक्त विश्वास शंकरराव आणि के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त पृथ्वीराज यांनी या तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या सांताक्रुज पूर्व प्रभाग क्रमांक 90 येथे करीना गीता विहार लेन येथे ए टू झेड गेस्ट हाऊस चे तीन मजली अनाधिकृत बांधकाम तक्रार देऊन देखील पूर्ण झाले असून कलिना गावठाण येथे हाऊस नंबर 87 जे तीन मजली अनधिकृत बांधकाम झाले असून वारंवार तक्रारी देऊन देखील कलिना गावठाण हाऊस नंबर 126 प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना देखील अनाधिकृत बांधकाम पूर्ण झाले असून सदर प्रकरणाची चौकशी झाली तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे हे स्पष्ट होईल तसेच जांभळीपाडा येथे शाळेच्या आरक्षित मोकळ्या भूखंडावरचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ असताना देखील अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट चालू आहे तसेच शास्त्रीनगर चुनाभट्टी अन्वर अली कंपाउंड समोर निष्काशीत केलेले अनधिकृत बांधकामाचे कनिष्ठ अभियंता सोनल आव्हाड यांच्या कार्यकाळात पुन्हा पूर्ण झाली असून सुंदर नगर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज च्या बाजूला डॉन्मिक चाळीचे प्रकरण देखील न्यायप्रविष्ठ असताना दुसऱ्या मजल्याचे अनधिकृत बांधकाम अभियंता सोनल आव्हाड यांच्या कार्यकालमध्ये पूर्ण झाले आहे. अशा पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा बुरखा फाडणार तरी कोण हा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहत आहे.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे