Breaking
महाराष्ट्र

शहीद वीर जवान संदीप केशव सपकाळ यांच्या स्मारकाच्या माध्यमातून डीगेवाडी ग्रामस्थांनी घालून दिला नवा आदर्श.

राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणजे भारत भूमीच्या रक्षणार्थ सीमेवर ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन भारत भूमीच्या दहा भुजांमध्ये आपल्या रक्ताचा अभिषेक करून मनोमन स्वतःच्या देहाचे बलिदान देऊन कृथार्थ झालेले आपले शहीद वीर जवान! राष्ट्रभक्तीचे प्रतीक म्हणजे काय तर? जेव्हा एखाद्या वीर जवानाचं पार्थिव तिरंगी झेंड्या मध्ये लपेटून आपल्या जन्मगावी येतं त्यावेळी ते पार्थिव देखील त्याने दिलेली शहादत लोकांच्या नजरेत भरवत असतं. स्वतःच्या कुटुंबापुरत मर्यादित न राहता राष्ट्रभक्तीसाठी आतंकवादी हमले अंगावर घेणाऱ्या किंवा सीमेवर लढणाऱ्या जवानाला वीरमरण येऊन स्मारकाच्या रूपातून आपल्या जन्मगावी अमर रहाणे ही परिकल्पना म्हणजे खरोखर त्या वीर आत्म्याला दिलेली आदराची आदरांजली! आणि ही अभिनव कल्पना राबवण्याचे काम शासनाचे नसून भारतातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे याचे उदाहरण तालुका पाटण मधील डिगेवाडी मुरुड येथील ग्रामस्थांनी आपल्या देशाप्रती प्रेम, राष्ट्रभावना, आणि शहीद वीर जवानांबद्दल आदर मनात ठेवून लोकसहभागातून शहीद जवान संदीप केशव सपकाळ यांचे अमर जवान स्मारक आणि प्रवेशद्वार बांधून एक आगळा वेगळा उपक्रम राबवून पूर्ण भारतामध्ये एक वीरांच्या प्रति सुसंस्कृत असा संदेश दिला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. अशी वीर जवानांची स्मारक प्रत्येक गावामध्ये बांधली गेली तर त्या गावातील तरुण मुलांच्या मनामध्ये देखील राष्ट्रभक्ती वीर जवानांच्या स्मारकांना बघून जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच डिगेवाडी ग्रामस्थांनी एक नवीन आदर्श घालून देऊन ग्रामस्थांच्या वतीने आणि माझी कर्नल महादेव काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहीद जवानांच्या कुटुंबाची विचारपूस केली.वीर जवानाच्या पत्नीचे सांत्वन करून भविष्यामध्ये कुठचीही मदत लागली तर मदतीचे आश्वासन दिले.त्यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची सर्वतोपरी जबाबदारी आणि इतर शैक्षणिक मदत देखील करण्याचे आश्वासन देऊन वीर जवानाचे कुटुंब ही गावची जबाबदारी हा मोठा आदर्श डिगेवाडीकरांनी घालून दिला. शहीद जवान संदीप केशव सपकाळ यांच्या स्मारकाचे मुखावलोकन माझी कर्नल माननीय श्री महादेव काटेकर तसेच तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी माननीय श्री अनंत देवांअण्णा गुरव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री आर. ए. भोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस निरीक्षक माननीय श्री सागर खबाले पोलीस उप निरीक्षक माननीय श्री रमेश ठाणेकर तथा सैनिक फेडरेशन सातारा चे माननीय श्री प्रशांत कदम आणि सिव्हिल इंजिनियर माननीय श्री देवानंद कदम तसेच एम ई एस एम इयत्ता दहावी बॅच 1999 आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच शहीद स्मारकाला मूर्त रूप देणारे शिल्पकार माननीय श्री कैलास नागसाखरे यांचे मनोमन आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.आमच्या वृत्तवाहिनीच्या वतीने स्वराज्य ग्रुप डीगेवाडी तथा ग्रामस्थ मंडळ डीगेवाडी वासियांना आणि या अलौकिक अशा सोहळ्याला मूर्त रूप देणारे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री अनिल डीगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मानाचा सॅल्यूट मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी डिगेवाडी मुरुड पाटण.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे