Breaking
ब्रेकिंग

मान्सून पूर्व मुंबईच्या रस्त्यांच्या कामामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक.

मुंबई महानगरी चे रूपांतर सिंगापूर मध्ये होत असतानाचे स्वप्न मुंबईकर पाहत असताना मुंबईतील मूलभूत पायाभूत सुविधांपासून मुंबईकर वंचित राहत असतानाचा दिसत आहे.न्यूज 18 जनमत टाइम्स चे मुख्य संपादक आणि टीमच्या ग्राउंड रिपोर्टच्या सर्वेक्षणानुसार मुंबईकरांना दैनंदिन जीवनात किती तारेवरची कसरत करायला लागत आहे याचा आढावा घेण्यासाठी आज ऐरोली टोल नाका जवळील ट्राफिकची मुख्य समस्या लक्षात घेता आय आर बी टोल नाक्याचा गलथान कारभार समोर आला.टोलनाका परिसरामध्ये कुठची पायाभूत सुविधा न देता टोल वसुली तसेच टोल कर्मचाऱ्यांचे गैरवर्तन याला जबाबदार कोण? तसेच टोल नाका क्रॉस केल्यानंतर खड्डा रस्त्यामध्ये आहे की रस्ता खड्ड्यामध्ये आहे याची पोलखोल करण्याचा प्रयत्न करत असताना मुंबईतील टॅक्स पेअर जनतेचे हावभाव कॅमेरा मध्ये टिपण्याचा प्रयत्न केला.वास्तविक मान्सूनपूर्व रस्त्यांची डागडूजी करण्याचे आद्यकर्तव्य प्रशासनाचे असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? हा सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न उद्भवत आहे.ठेकेदार आणि महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी यांच्या आपसातील संगणमताने मुंबईतील रस्त्यांवर स्मशान सदृश्य परिस्थिती पहावयास मिळत आहे.अशा मुंबईतील रस्त्यांवर जीवित आणि वित्तहानी होण्याच्या घटना रोजच कानावर पडत आहेत, याला वाली कोण? अशा घटनांवर होणाऱ्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल तरी कुणावर करायचा हा प्रश्न उभा ठाकत आहे.मुंबई महानगरपालिका मान्सून पूर्व नालेसफाई साठी कोरडे रुपयाचा निधी उपलब्ध करून देत असताना देखील पावसाळ्यात पूर सदृश्य परिस्थिती पहावयास मिळत आहे.नालेसफाईच्या नावावर करोडो रुपयांचा निधी देऊन महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत नालेसपाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी रेड कार्पेट अंथरली जात आहेत.तसेच घनकचरा व्यवस्थापनाच्या देखील गलथान कारभारामुळे डम्पिंग ग्राउंड वर जेवढा कचरा जातो तेवढाच काळा पैसा या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरामध्ये देखील जातो हे बोललं तर वावग ठरणार नाही.आशा मुंबईतील समस्यांकडे महानगर पालिकेचे भ्रष्ट अधिकारी यांनी जातीने लक्ष दिले नाही तर भविष्यामध्ये देखील न्यूज 18 जनमत नेहमी सतर्क राहून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची पोल खोल करत राहणार.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे