Breaking
ब्रेकिंग

रायगड मतदार संघाच्या वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभा निवडणुकीला रायगडच्या विकासाचे मुद्दे घेऊन सौ कुमुदिनी रवींद्र चव्हाण शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांना ठरणार मोठं आव्हान.

*कुमुदिनी ताई चव्हाण* यांचा जन्म पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्याच्या जवळ *ओतूर गावात प्राध्यापक आर.बी.डुंबरे व आई कृष्णाबाई डुंबरे पाटील या मराठा कुटूंबात झाला.* लहानपणा पासून क्रीडा आणि शिक्षणाची आवड होती. बी. ए पर्यंतचे शिक्षण ओतूर मध्ये करून पुढे क्रीडा शिक्षण घेण्यासाठी पुण्यात भारती विद्यापीठात प्रवेश घेतला. बी. पी. एड,. एम. पीएड., एम. फील. व आता *आदिवासी जीवनावर पी एच डी* सुरु आहे. शिक्षण सुरु असताना सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. राष्ट्रीय सेवा योजना ते *स्वतःची शिक्षण संस्था कोकण विकास प्रबोधिनी* हा प्रवास आज कुमुदिनी चव्हाण यांना सावित्रीची लेक या उपाधी पर्यंत घेऊन गेला आहे. सावित्रीची लेक, रायगड भूषण, हिरकणी, महाराष्ट्राची सुकन्या, अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न राष्ट्रीय जीवन गौरव, कर्तृत्व शिक्षणरत्न, रणरागिणी, असे अनेक पुरस्कार कुमुदिनी यांना मिळाले आहेत. कुमुदिनी चव्हाण यांनी पती रवींद्र चव्हाण यांच्याशी विवाह झाल्या नंतर, शेतकरी गोरगरीब, आदिवासी, विटभट्टी कामगार, भटक्या समाजाची मुलं, यांच्या करिता शाळा काढण्याचा संकल्प केला. आणि त्या करिता त्यांनी कोकणातील *महाड तालुक्यातील चोचिंदे* गावाची निवड केली. शिक्षण संस्था उभारून *मॉडर्न इंग्लिश स्कूल* नावाने इंग्रजी माध्यम शाळा सुरु केले. कुमुदिनी चव्हाण यांनी 17 वर्षा पूर्वी सुरु केलेल्या शाळेची ओळख आता देशातील सर्वात कमी फी घेऊन इंग्रजीचे दर्जेदार शिक्षण देणारी शाळा अशी झाली आहे. सेवाभावी तत्वावर शाळा चालविणाऱ्या कुमुदिनी चव्हाण यांना मजुर, आदिवासी, शेतकरी यांच्या मुलांना इंग्रजी बोलताना पाहून खूप आनंद होतो हीच माझी खरी फी आहे असं त्या बोलतांना म्हणतात. त्यांच्या शाळेत अनेक मुलं फुकट शिकतात. कुमुदिनी चव्हाण या उत्तम वक्त्या आहेत रायगड जिल्ह्यात त्यांना व्याख्यात्या म्हणूनही ओळखल्या जाते. रायगड जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ माँसाहेब यांची त्या पूजा करतात. *भारतीय मराठा महासंघाच्या त्या रायगड जिल्हा अध्यक्षा आहेत.* रायगड जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी या विषयी कुमुदिनी यांना फार चिंता वाटते. रोजगार निर्माण झाला नाही तर गाव खेडी ओस पडतील अशी भीती त्या बोलून दाखवतात. रोजगार, आरोग्य, शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी असतो पण दुर्दैव रायगडच्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीना ते 40 वर्षात समजलेलं नाही. म्हणून कुमुदिनी यांनी लोकप्रतिनिधी होण्याचे ठरविले आहे. त्या *वंचित बहुजन आघाडी पक्ष* अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षा कडून रायगडची लोकसभा लढविणार आहेत. गाव खेड्यात फिरताना गावातील 70% घरानां कुलूप लावलेलं दिसते, मोजकीच वयस्कर माणसे गावात दिसतात. गावात लहान लेकरंच नाहीत म्हणून शाळेच्या इमारती आहेत, शिक्षक आहेत पण मुलं एक किंवा दोन अशी परस्थिती गाव खेड्यात झाली आहे. हे चित्र बद्दलण्यासाठी मला लोकसभा लढवावी लागेल. रायगड मध्ये पाऊस खूप पडतो, पुर, दरडी यात जीवित हानी व वित्त हानी मोठया प्रमाणात होते. या वर कायमचा उपाय पुनर्वसन व उपाय योजना राबविण्याचे काम मी करेल. आदिवासी लोकांची पडकी घर सुकलेले चेहरे, कुपोषित बालक पाहून अंतःकरण भरून येत. मला यांच्या विकासासाठी लोकसभेत जावच लागेल. अनेक गावात नळ योजना आहे. पाईप लाईन आहे, पण पाणीच नाही. मी दिल्लीत गेले तर रायगडच्या प्रत्येक घरात पाणी आणि लाईट फुकट देईल. अपूर्ण रस्ते, धरणाचे काम एका वर्षात पूर्ण करून देईल. हे माझे वचन आहे, असेही कुमुदिनी चव्हाण मतदारांना भावनिक आव्हान करतात.

0 0 3 8 1 4
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर रायगड मधून कुमुदिनी चव्हाण यांना उमेदवारी घोषित.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे