Breaking
महाराष्ट्र

जुन्नर तालुक्यातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७६ लक्ष रूपयांची तरतूद करण्याचे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांचे आदेश.

पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या नियोजन संदर्भात आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठक आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन पुणे येथे पार पडली. या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील विविध विकासकामांसंबंधी चर्चा करण्यात आली आणि विविध कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील पूर्व भागातील आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्प अहवालासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ७६ लक्ष रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आणे पठार उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत आणे, शिंदेवाडी, पेमदरा आणि शिंदेवाडी या प्रमुख गावांचा समावेश होतो. याबाबत आ.अतुल बेनके यांनी सांगितले, आणे पठार उपसा सिंचन योजनेमुळे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील आणे, शिंदेवाडी, पेमदरा आणि शिंदेवाडी या भागातील नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ७६ लक्ष रू. इतक्या निधीची तरतूद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला याबद्दल शासनाचे आणि अधिकारी वर्गाचे विशेष आभार देखील आ. अतुल बेनके यांनी मानले. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांसह जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्य संपादक न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे