Breaking
कृषीवार्ता

राज्यातील खरीप-२०२४ हंगामासाठी तलाठ्यांच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी २६ ऑक्टोबरपर्यंत राहणार चालू.

सौजन्य : ॲग्रोवन राज्यातील खरीप-२०२४ हंगामासाठी तलाठ्यांच्या स्तरावर चालू असलेली ई-पीकपाहणी २६ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली. खरिपासाठी यंदा शेतकरी स्तरावरील ई-पीकपाहणी एक ऑगस्टला सुरू झाली होती. त्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत होती. मात्र, राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी करता आली नाही.त्यामुळे याच्या नोंदी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या होत्या. त्याची दखल घेत जमाबंदी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांनी शेतकऱ्यांना ई-पीकपाहणीसाठी एक आठवड्याची मुदतवाढ दिली. ‘‘राज्यात शेतकऱ्यांच्या स्तरावरील ई-पीकपाहणी २३ सप्टेंबरला समाप्त झाली आहे. आता तलाठ्यांच्या स्तरावरील पीकपाहणीची कामे जलदरित्या सुरू आहेत,’’ असे महसूल विभागातून सांगण्यात आले.खरिपासाठी यंदा दोन प्रकारची ई-पीकपाहणी केली जात आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारित सुरू असलेल्या ई-पीकपाहणी म्हणजेच डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) अजून २३ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. ही पाहणी २८०० गावांपुरती मर्यादित आहे. राज्यातील इतर ४१ हजारांहून अधिक गावांमध्ये राज्य शासनाची ई-पीकपाहणी (नॉन डीसीएस) तलाठ्यांच्या पातळीवर २७ ऑक्टोबरपर्यंत सुरू असेल. शेतकरी व तलाठ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १.२० कोटी हेक्टरची ई-पीकपाहणी पूर्ण झालेली आहे.कृषी विभागाने कापूस व सोयाबीन उत्पादकांना आर्थिक मदत वाटपासाठी ई-पीकपाहणीची अट टाकली. त्यामुळे यंदा ई-पीकपाहणीचा मुद्दा राज्यभर चर्चेला आला. मात्र, ई-पीकपाहणीत समस्या येत असल्याने ही अट काढून टाकण्याची मागणीदेखील काही भागातून झाली. ई-पीकपाहणीतील समस्या दूर करण्यासाठी महसूल विभागाने सर्व्हरची क्षमता यंदा वाढवली, असा दावा सूत्रांनी केला आहे. अशी आहे ई-पीकपाहणीची ताजी स्थिती... शेतकऱ्यांची खाते संख्या : २२६,६७,९३२ भ्रमणध्वनीद्वारे झालेली पीकपाहणी : ७९,२३,९५५ तलाठ्यांनी केलेली पीकपाहणी : ५,६०,३३ भ्रमणध्वनी व तलाठ्यांनी केलेल्या पीकपाहणीचे एकूण क्षेत्र : १,२०,५१,२२३ हेक्टर दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्यांना महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले, की भ्रमणध्वनी अथवा कोणत्याही प्रकारे झालेल्या ई-पीकपाहणीची नोंद दुरुस्त करून घेण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी आधी तलाठ्याकडे अर्ज करावा लागेल. तसेच, तलाठ्यांच्या स्तरावर झालेल्या नोंदीमधील दुरुस्तीचे अधिकार मंडळ अधिकाऱ्याला आहेत. मात्र, दुरुस्तीपूर्वी या अधिकाऱ्याने गावाला भेट देत पंचनामा करणे आवश्यक आहे. मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4

5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे