Breaking
ब्रेकिंग

समाजभूषण शिवनेरी भूषण ज्येष्ठ पत्रकार श्री भरत अवचट साहेब काळाच्या पडद्याआड.

भावपूर्ण श्रद्धांजली....... समाजभूषण,शिवनेरी भूषण, जेष्ठ पत्रकार स्व. भरत अवचटसाहेब 🙏 ओतूर गावातील प्रसिद्ध ‘अवचट’ कुटुंबात स्व. भरत अवचट यांचा जन्म झाला. आपल्या केवळ गावासाठीच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीसाठी, शिवजन्मभूमि जुन्नर तालुक्यासाठी आयुष्यभर, आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम करत असलेले ज्येष्ठ पत्रकार स्व. भरत अवचटसाहेब हे असेच एक ज्ञानाचा स्पर्श झालेले आणि चैतन्याचा सुगंध लाभलेले, राजस व्यक्तिमत्त्व होते. आपल्या पूर्वसंचिताने, अंगीभूत सौजन्याने, माणुसकीच्या गहिवराने, उभे आयुष्य एखाद्या मिणमिणत्या मेणबत्तीप्रमाणे, परिसराला उजळून टाकण्यासाठी खर्च करून आणि आपले आयुष्य सार्थकी लावून सामान्यातील काही असामान्य माणसे, आपले सारे आयुष्य लोकोपयोगी करून ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्यासारखी व्यक्तिमत्त्व आनंदाने जीवन व्यतीत करून समाजाची सेवा करत असतात. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो,लोकशाहीला अधिकाधिक बळकट करण्यासाठी पत्रकारिताही तेवढीच प्रामाणिक,निर्भीड आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नि:पक्षपाती असायला हवी. ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांची पत्रकारिता आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेच्या तोडीची होती. आजच्या आव्हानात्मक परिस्थितीतही हा वसा आणि वारसा जतन करण्याचे सामर्थ्य ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्या पत्रकारितेत निश्चित होते. ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जुन्नर तालुक्यात मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून बुरसटलेले विचार असलेल्या समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या क्षेत्रापुढे अनेक आव्हाने असली, तरी पत्रकारितेच्या मूल्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही, असा धडा ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांनी त्यांच्या कर्तृत्वातून घालून दिला होता. पत्रकार हा समाजाचा आरसा असतो,समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे फार मोठे योगदान असते.अन्याय, अत्त्याचार,भ्रष्टाचार, समाजातील उपद्रवमूल्य याबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भिडपणे आवाज उठवून ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्यासारखे पत्रकार मा. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या आदर्श पत्रकारितेला न्याय देत आले. पत्रकारितेच्या आजच्या या बदलत्या स्वरूपातही ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्यासारखे पत्रकार हे पत्रकारितेचे आणि लोकशाहीच्या चौथ्या खांबाचे पावित्र्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत आले. ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब नेहमी प्रवाहाच्या बाजूने वाहत न जाता निर्भिडपणे, सद्सत् विवेक जागृत ठेऊन ज्यांना स्वत:चा आवाज नाही, त्यांचा आवाज होऊन त्यांच्या मूक आवाजाला निर्णय कर्त्यांपर्यंत, बहुसंख्याकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आले. ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांचे लोकांना नवी दृष्टी देण्याचे, लोकांना डोळस करण्याचे काम अविरतपणे सुरू होते. लोकप्रिय समजुती धुडकावत आपल्या श्रद्धास्थानांची चिकित्सा तटस्थपणानं करण्याचे संस्कार ते समाजावर करत आले. लोकशाहीत पत्रकारांचं मोठं महत्व आहे. पत्रकारांचं काम सकळजनांना शहाणं करणं असते, म्हणून ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांचे समाजाला जागृत करण्याचं व्रत नेटाने चालू होते. लोकशिक्षण करत असताना समाजात नेमकं काय सुरु आहे, त्यावर तटस्थ भाष्य करुन समाजाला दिशा देण्याचे त्यांचे काम रात्रंदिवस चालू होते. समाजात ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांच्या कर्तुत्वाचा वेलू गगनावरी गेला, आपल्या गावात ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेब यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांनी समाज प्रबोधनासाठी समर्पित भावनेने जीवन व्यतीत केलेले दिसून येते. समाजसुधारणा साठी जाणीव पूर्वक प्रयत्न केले,आपली लेखणी लोकांच्या उद्धारासाठी झिजविली, या भूमीत आपल्या विशेष शैलीने आपल्या लेखणीतून नेहमीच शहाणपण पेरण्याचे काम केले. ज्येष्ठ पत्रकार स्व.भरत अवचटसाहेबांचे आज आकस्मित निधन झाले. ही घटना ओतूरसह ओतूर पंचक्रोशीला चटका लावून गेली. भावपूर्ण श्रद्धांजली.....🙏

0 0 3 8 1 4

समाज भूषण शिवनेरी भूषण ज्येष्ठ पत्रकार श्री भरत अवचट साहेब काळाच्या पडद्याआड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे