Breaking
संपादकीय

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर .. प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा..!

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर .. प्रत्येकानं वाचावीच अशी अंगावर काटा आणणारी आणि अवाक करणारी अशी ही माय-लेकाची यशोगाथा.. 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची.. आज या दोघांचा यशोगाथा पाहू.. अमितचं बालपण गेलं ते घुंगरांचा आणि ढोलकीचा आवाज ऐकत... तमाशालाच जिथे पंढरी समजली जाते, अशा कोल्हाटी समाजातला तो मुलगा... तो यूपीएससी उत्तीर्ण होऊन अधिकारी झालाय. घुंगरू आणि ढोलकीसोबत जगणं एकदा का पायी घुंगरू बांधले... की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात... एकदा का ओठ रंगवले की सगळं दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा... ढोलकीवर थाप पडली की शिट्ट्या पडेपर्यंत फक्त बेभान होऊन फक्त नाचत राहायचं... कोल्हाटी समाजातल्या बायकांचं हेच जगणं... सगळं आयुष्य वेचायचं ते या लोककलेची सेवा करण्यात... लग्न वगैरे काही भानगडच नाही... 'शोधीत एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला शाम...' असा एखादा कुणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो... अशीच कथा राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळेची... 'कलेक्टर व्हायचंय....' नगरमधली राजश्री काळे... लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी... आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कालिका कला केंद्र चालवणारी... व्यवसायानं तमाशा कलावंत... तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं... तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं... त्यात पोराबाळांची परवड होते... शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाचा झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको, म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेलला. लहानपणापासून पोराला समजावलेलं, तुला कलेक्टर व्हायचंय... पोरानंही आईच्या कष्टांचं सोनं केलं... आज अमित यूपीएससी उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय. यशात माऊलीचा हात... अमित मारुतराव काळे... यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव... कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून कोसो दूर... पण पोटाला कितीही चिमटे बसले तरी आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचंच, हा या माऊलीचा निश्चय... लावणी-सम्राज्ञी म्हणून राजश्री काळे यांचा गौरव झालाय... पण, आज यूपीएससीतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टाहास... तिच्या कष्टांची आज फुलं झालीत... आमच्या वृत्तवाहिनी कडून अमित काळे यांच्या माऊलीला मानाचा सलाम मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे