Breaking
ब्रेकिंग

पुणे बेंगलोर नॅशनल हायवे, कराड कोल्हापूर नाक्यावरील रस्त्यावर नॅशनल हायवे प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या संगणमातामुळे पडलेल्या खड्ड्यांच्या रूपामध्ये अवतरले यमदूत !आणि म्हणून कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस वाहन चालकांसाठी बनले आहेत जणूकाही देवदूत!

पुणे बेंगलोर हायवे क्रमांक (14 ) नॅशनल हायवे अथोरिटी म्हणजेच प्राधिकरणा कडून नॅशनल हायवे प्राधिकरणाचे भ्रष्ट अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या संगनमताने मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्ती मध्ये मोठा भ्रष्टाचार केला असून कराड कोल्हापूर नाका आणि जवळजवळ चार ते पाच किलोमीटर पर्यंत च्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या रूपामध्ये जणू काही यमुदतच अवतरले आहेत की काय याचा आभास वाहन चालकांना होतो आहे.रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येऊ शकत नाही.प्रत्यक्ष स्थळपहानी केली असता रस्ता खड्ड्यामध्ये आहे की खड्डा रस्त्यामध्ये आहे हे देखील समजत नाही!अशातच ट्राफिक पोलीस तारेवरची कसरत करून वाहन चालकांना कर्तव्य तत्पर ट्राफिक पोलिसांच्या रूपाने देवदूत पाहावयास मिळत आहेत. अगदी देवदूताप्रमाणे वाहन चालकांना दिशा निर्देश देऊन ट्राफिक पोलीस कधी कधी आपल्या जीवाची परवा न करता रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहन चालकांना सूचना देऊन भर पावसामध्ये आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.स्वर्गीय यशवंतराव चव्हाण प्रवेशद्वारासमोरच रस्त्यांच्या मधोमध खड्ड्यांच साम्राज्य बघताना नॅशनल हायवे प्राधिकरणाने आपली लाज जणू काही वेशीला टांगली आहे की काय हा संभ्रम वाहनचालकाच्या मनात तयार होत आहे.मान्सून पूर्व रस्त्यांचे काम युद्ध पातळीवर करण्याऐवजी नॅशनल हायवे प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्यासंगमताने आपले खिसे गरम गरम करून घेतले आहेत,त्यामुळे वाहन चालक तसेच पदाचारी शालेय मुले आणि ट्राफिक पोलीस यांच्या जीवाचा खेळ होत आहे. नॅशनल हायवे प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्यामुळे कित्येक एक्सीडेंट होऊन काही पदाचारी वाहन चालक विकलांग झाले आहेत,आणि भविष्यामध्ये एखादा अपघात होऊन सामान्य नागरिक किंवा वाहन चालक मृत्युमुखी पडला तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व त्या मनुष्यवधाची सर्वस्वी जबाबदारी नॅशनल हायवे प्राधिकरणाचीच असेल! आमच्या चॅनलच्या माध्यमातून कर्तव्यदक्ष ट्राफिक पोलिसांना खरोखर आमचा सॅल्यूट आहे.आपल्या कर्तव्य तत्परतेची जाणीव येऊन स्वतःची तमा न बाळगता वाहनचालकांना सावधानतेचा इशारा देऊन पोलीस दादा आपलं काम भर पावसात तत्परतेने करत आहेत.खरोखर खाकी वर्दीतील या देवदूतांना सलाम आहे.परंतु नॅशनल हायवे ऍथॉरिटीतील भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांचं काय? नॅशनल हायवे प्राधिकरणातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करून तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात यावे, अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांना देखील ई-मेल द्वारे ग्राउंड रिपोर्ट सादर केला जाईल. तसेच आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मांडलेल्या जनसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा नॅशनल प्राधिकरणाने अपडेट घेतला नाही तर! लवकरच एक जण आंदोलन छेडलं जाईल आणि या नॅशनल हायवे प्राधिकरणातील भ्रष्टाचारी सरकारी बाबू आणि ठेकेदार यांचा बुरखा फाडला जाईल.ग्राउंड रिपोर्ट मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे