Breaking
गुन्हेगारी

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा काही महिन्यापूर्वी पोलिसांच्या बरोबर झालेल्या चकमकी मध्ये मृत्यू झाला त्यामुळे पोलीस कोठडीतील मृत्यूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत.

न्यूज 18 जनमत प्रतिनिधी मुंबई : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा काही महिन्यांपूर्वी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यामुळे पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील पोलीस कोठडीत ६८७ जणांचा मृत्यू झाला आहे. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ कालावधीतील या आकडेवारीनुसार, सर्वाधिक म्हणजे ८१ मृत्यू गुजरातमध्ये झाले असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात या काळात ८० जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. मुंबईत अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अनुज थापन (२३) याने १ मे २०२४ रोजी गुन्हे शाखेच्या कोठडीत आत्महत्या केली होती. त्यापूर्वी जानेवारी २०२४ मध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट येथील गोवर्धन गणेश हरमकार (१९) याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणी एक पोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस शिपायाला अटक करण्यात आली. चोरीत सहभागी असल्याचा संशयावरून त्याला अटक करण्यात आली होती. याशिवाय मुंबईत हवाई सुंदरीची हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल (४०) याने ८ सप्टेंबर २०२३ रोजी अंधेरीत कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दीपक जाधव (२८) याने २८ जुलै २०२३ रोजी बोरिवली येथे कोठडीत आत्महत्या केली होती. ४ ऑगस्ट २०२३ रोजी विशाल ढेंडे याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. हरियाणातील कुख्यात टोळीचा प्रमुख संदीप गडोली याला ७ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंबईत हरियाणा पोलिसांनी चकमकीच ठार केले होते. हरियाणा पोलिसांनी मुंबईत केलेल्या या चकमकीवर अनेक आरोप झाले होते. त्यामुळे ही चकमक गाजली होती. आरोपांमुळे लगाम मुंबईत टोळीयुद्ध सुरू झाल्यानंतर पोलिसांनी गुंडांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. पोलिसांबरोबर १९९९ मध्ये झालेल्या चकमकीत ८३ गुंड मारले गेले. त्यामुळे गुन्हेगारांनी धसका घेतला होता. २००० मध्ये पोलीस चकमकीत ७३, तर २००१ मध्ये पोलीस चकमकीत ९४ गुंड मारले गेले होते. मुंबई पोलीस दलाच्या इतिहासातील हा उच्चांक होता. त्यानंतर २००२ मध्ये ४७ गुंडांचा चकमकीत खात्मा झाला. दरम्यानच्या काळात पोलिसांवर आरोप करण्यात आले. या आरोपांमुळे मुंबईतील चकमक बंद झाल्या. मुख्य संपादक न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी

0 0 3 8 1 4

5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे