Breaking
ब्रेकिंग

मुक्काम पोस्ट तारुख तालुका कराड येथील ग्रामस्थांनी माझी कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक आणि पोलिस दलातील अधिकारी यांचा 15 ऑगस्ट चे औचित्य साधून केला मोठा जल्लोष पूर्ण सत्कार समारंभ साजरा.

वैयक्तिक गोष्टीचे महत्त्व व्यक्तिगत स्वार्थापेक्षा आपल्याला अधिक जाणवते अशा गोष्टी प्रति आपण आपली भक्ती व्यक्त करत असतो. देव असो वा देश असो भक्ती ही आपल्या देशवासीयांसाठी एक जीवनाचा मार्ग ठरलेला आहे.त्यामुळे खरी देशभक्ती ही संपूर्ण देशाचा आणि येथील नागरिकांचा विकास घडवून आणू शकते.एका विशिष्ट अध्यात्मिक सांस्कृतिक आणि भौगोलिक आधारावर उभ्या असलेल्या आपल्या भारत देशाबद्दल आपल्याला वाटणारा कमालीचा आदर आणि अशा सांस्कृतिक मूल्यांच्या वृद्धी साठी देशाप्रती केली जाणारी कृती म्हणजेच प्रत्येक नागरिकांसाठी देशभक्ती. हीच देशभक्ती फक्त सीमेवर निर्धारित न राहता, सीमेवर अविरत पहारा देणाऱ्या सैनिकांप्रती आपुलकी ,प्रेम भावना, आणि सैनिकांनी दिलेल्या त्यांच्या आयुष्यभराच्या अविरत सेवेसाठी कृतज्ञ राहिल पाहिजे! असंच एक उदाहरण सैनिकांच्या प्रती असलेलं आपलं प्रेम तारुख गावच्या ग्रामस्थांनी कृतीतून दाखवून दिलं.सैनिकांप्रती सामाजिक वातावरण निर्मिती करणे म्हणजेच देशभक्ती! हे ज्वलंत क्रांतिकारक परिकल्पनेच्या विचाराचं जणूकाही बीजच तारुख वासियांनी अंकुरित केलं. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपला देश एकत्र आला होता तेव्हा जी देशभक्ती जाणवली तदनंतर बहुदा भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तारुख गावचे ग्रामस्थ एकत्र येऊन सैनिकांना जी माणुसकीची मानवंदना देऊन तारुख वासियांनी देशभक्तीची जाणीव करून दिली. तारुख वासियांची कृती सुवर्णा अक्षरांमध्ये कोरण्यासारखीच ठरेल.आज देशभक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा यंत्रणेत सामील होऊन देशसेवा करणे असाही एक अर्थ तयार झालेला आहे परंतु हा अर्थ तारुख गावच्या ग्रामस्थांनी मोडीत काढून माझी कर्नल श्रीमान महादेव लक्ष्मण काटेकर आणि पंचक्रोशीतील इतर आजी माजी सैनिक, पोलीस खात्यातील निवृत्त अधिकारी यांच्या प्रति असलेल्या आपल्या भावनिक सद्भावना ग्रामस्थांनी आपल्या कृतीतून दाखवून दिल्या.माझी कर्नल श्रीमान महादेव काटेकर यांना जणू काही ग्रामस्थांच्या हृदयाच्या रथामध्ये विराजमान करून डोळ्यांमधील आनंदी अश्रूंच्या फुलांची उधळण करून कर्नल साहेबांना जो मानाचा सॅल्यूट दिला तो सॅल्यूट म्हणजे खरी देशभक्ती म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.कर्नल साहेबांचा सपत्नीक झालेला सन्मान बघून त्या माऊलीच्या आनंदी अश्रूंचा देखील बांध फुटला. बँजो वरच्या देशभक्तीपर गीतांनी तारुख परिसर अगदी दुमदुमून गेला.असा भक्तीपर तिरंगी सोहळा अगदी डोळ्याचे पारणे फेडण्यासारखा होता.देश हा तेथील व्यक्तींनी मोठा होत असतो त्यामुळे प्रत्येक बालक तथा तरुणांनी भारताच्या उज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे.व्यक्तीमध्ये नैतिक मूल्यांची वाढ होत गेली तर देशभक्ती काही वेगळी शिकवण्याची गरज भासणार नाही हा मोलाचा सल्ला कर्नल साहेबांनी यावेळी तरुणांना दिला.देशभक्ती ही फक्त स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिना दिवशीच न दाखवता प्रत्येक क्षणी ती आपल्या कृतीतून दिसायला हवी आणि तारुख वासीयांनी खरोखर जो सन्मान मला आणि आमच्या माजी सैनिकांना देऊन अगदी कृतार्थ केले असं देखील न बोलताच कर्नल साहेबांच्या डोळ्यांचे भाव सांगून गेले.ह्या अमृततुल्य सोहळ्याचे आयोजन तारुख गावातील विविध संघटना,रॉयल फौजी ग्रुप, ज्योतिर्लिंग मंडळाचे सर्व पदाधिकारी, गावचे सरपंच तसेच सदस्य, तसेच अखिल भारतीय मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष विवेक कुऱ्हाडे साहेब, तालुका अध्यक्ष युवराज कुराडे तसेच माझी कर्नल साहेबांना अवक्षण करणाऱ्या सर्व महिला भगिनी इत्यादींनी आपल्या निस्वार्थ भावनेमधून देशापुढे एक नवा आदर्श घालून दिला.तारुख गावच्या ग्रामस्थांना आमच्या वृत्तवाहिनीच्या वतीने मानाचा सॅल्यूट मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे