Breaking
ब्रेकिंग

मुंबई महानगरपालिके मार्फत मान्सून पूर्व नालेसफाईला मिळणाऱ्या निधीचा महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होतो आहे मोठा भ्रष्टाचार.

मुंबई महानगरपालिका मान्सून पूर्व नालेसफाई साठी कोरडे रुपयाचा निधी उपलब्ध करून देत असताना देखील पावसाळ्यात पूर सदृश्य परिस्थिती पहावयास मिळत आहे. मुंबई उपनगरामध्ये देखील काही हायटेक सोसायटीच्या प्रांगणामध्ये पाणी भरलेल्या चे चित्र नेहमीच बघायला मिळते तर मग गोरगरीब जनतेच काय? निकृष्ट दर्जाच्या नालेसफाईमुळे गोरगरीब जनतेच्या स्लम एरियामध्ये अक्षरशः घरामध्ये पाणी घुसत असते कित्येक वेळा तर गरीब जनतेचा संसार अक्षरशा वाहून गेलेला आपण उघड्या डोळ्यांनी पाहत असतो. अगोदरच वाहून गेलेला संसार आणि तुंबलेल्या पाण्यामुळे साथीचे रोग....! या सर्व गोष्टींना जबाबदार धरायच तरी कोणाला हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमीच घर करत असतो.करोडो रुपयांचा निधी देऊन देखील नालेसफाई ज्या पद्धतीने व्हायला हवी त्या पद्धतीने होत नाही.भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे राजकीय नेत्यांच देखील दुर्लक्ष होतं कारण परसेंटेज च्या रूपाने राजकीय नेते देखील आपली पोळी भाजून घेत असतात.यामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार यांना देखील परसेंटेज ठरलेलं असतं.महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्फत नालेसफाईची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाठी रेड कार्पेट अंथरली जातानाचे चित्र मध्यंतरीच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होऊन मुख्यमंत्र्यांनी नालेसफाईची पाहणी करतानाचा व्हिडिओ अगदी खरोखर डोळ्याचे पारणे फेडणारा होता.आज गोवंडी पूर्व आणि चेंबूर या विभागातून जाणाऱ्या नाल्याच्या बाबतीत न्यूज 18 जनमत च्या व्हिडिओ जर्नालिस्टने सबब नालेसफाई च्या बाबतीत नालेसफाईची शहानिशा करण्यासाठी न्यूज 18 जनमत ची टीम गेली असता संबंधित नाला परिपूर्ण चिखलाने लुप्त होता.वरवरची नालेसफाई करून ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहेत आणि ठेकेदार यांच्यावर कुठलाही अंकुश नसल्यामुळे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरदहस्तांमुळे पुन्हा एकदा 26 जुलै होईल की काय याची शंका आल्याशिवाय राहत नाही.भविष्यामध्ये पुन्हा एकदा 26 जुलै ची पुनरावृत्ती झाली तर भ्रष्टाचारामध्ये लुप्त असणाऱ्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे निलंबन करणार तरी कोण? कारण परसेंटेजचा मेवा नगरसेवक पासून ते खासदारापर्यंत पोहोचलेला असतो.अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून ठेकेदारांना सुद्धा ब्लॅक लिस्ट करून त्यांचे पेमेंट मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी थांबवलं पाहिजे आणि असे झाले नाही तर.न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनीचा चा कॅमेरा संपूर्ण मुंबईतील नालेसपाईवर फिरवून नालेसफाईची पोलखोल करत राहणार ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 जनमत मुख्य संपादक सतीश नलावडे.

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे