Breaking
ब्रेकिंग

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम पूर्व आणि एम पश्चिम विभागामध्ये नालेसफाईच्या कामामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने झाला आहे मोठा भ्रष्टाचार.

मुंबई महानगरपालिकेतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागामध्ये नालेसफाईच्या कामांमध्ये अधिकारी व कॉन्टॅक्टर यांच्या संगनमताने झाला आहे मोठा भ्रष्टाचार. 2022-2023 या वर्षासाठी एम पश्चिम आणि एम पूर्व विभागांतर्गत मोठे नाले छोटे नाले बॉक्स ड्रेनेज पाईप नाले आणि नाल्यांमधून काढलेला गाळ वाहून नेणारी वाहने स्वच्छ करणे यासाठी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि या अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असलेले कॉन्टॅक्टर यांनी आपसातील संगनमताने सर्वसामान्य जनतेच्या कररूपी पैशांमधून आपल्या अधिकारांचा गैरवापर करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणारे संबंधित अधिकारी यांची चौकशी करून जर ते दोषी आढळले तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित कायद्यानुसार अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून संबंधित ठेकेदारांचे बिल थांबवून अशा मर्जीतील ठेकेदारांना ब्लॅक लिस्ट करण्यात यावे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित मुख्य कार्यालयामार्फत पावसाळ्यामध्ये मुंबई उपनगरांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका करोडो रुपयांचा निधी दरवर्षी उपलब्ध करत असते प्रत्येक वर्षी पावसाळ्या मधील मुंबईतील पूरसदृश्य स्थिती पाहता महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने निविदा काढून या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कृपा आशीर्वादामुळे संबंधित ठेकेदार नियमबाह्य नालेसफाई करून मुंबईतील नागरिकांच्या जीविताशी खेळून हे ठेकेदार आपले व संबंधित अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून प्रत्येक वर्षी घेत असतात.मोठे नाले व छोटे नाले सफाई करत असताना नाल्यातून निघालेला गाळ नाल्याच्या बाजूला सुकवून नंतर तो डंपिंग करण्यासाठी घेऊन जाणे या अटी व शर्तींचे हे ठेकेदार राजरोसपणे पायमल्ली करत असतात त्यामुळे हा ओला गाळ घेऊन जात असताना संबंधित वाहनातून रोडवर पडल्यामुळे त्याचा दुर्गंध येत असल्याने मुंबईतील जनसामान्य लोकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत असतो तसेच हा ओला गाळ रोडवर पडल्याने बाईक स्वरांचे सर्रास एक्सीडेंट होताना दिसत असतात या एक्सीडेंट मध्ये कितीतरी मुंबईतील चाकरमानी मृत्युमुखी देखील पडलेले आहेत या सदोष मनुष्यवधाचा जबाबदार कोण? हा प्रश्न नेहमी अनउत्तरीत राहत आहे महोदय पावसाळ्यामध्ये मुंबईतील हायटेक अशा सोसायट्यांच्या प्रांगणामध्ये देखील पूरसदृश्य स्थिती सर्रास पाहायला मिळते तर मग झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना वाली कोण? आणि या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरून संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांचा यामध्ये काय दोष? ठेकेदारांच्या नियमबाह्य कामामुळे पाणी साठवून साथीच्या आजारांना देखील मुंबईकरांना दरवर्षीच सामोरे जावे लागते अगोदरच वाहून गेलेला संसार आणि साथीचे आजार यामुळे मुंबईकर मेटाकुटीला आलेला असतो.अर्जामध्ये मी केलेले वर्णन याचे मी आमच्या चॅनेल मार्फत व्हिडीओ शूट घेऊन त्याचे फोटो देखील आमच्याकडे जतन करून ठेवले आहेत कृपया याची नोंद घ्यावी! महोदय यावर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झाल्यास या सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी व त्यांच्या मर्जीतील ठेकेदार आणि सहाय्यक मनपा आयुक्त एम पश्चिम हे अधिकारी असतील. नक्की संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत चैनल.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे