Breaking
ब्रेकिंग

वाढदिवस अभिष्टचिंतन…धोलवड गावचे सुपुत्र स्तंभलेखक श्री संजय दादा नलावडे.

वाढदिवस अभिष्टचिंतन......"शिवनेरीची श्रीमंती"चे रचनाकार प्रसिद्ध लेखक श्री.संजय नलावडे साहेब🌹 मनुष्याने आपल्या दैनंदिन जीवनात जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबासह गावाच्या तालुक्याच्या हितावह दिलेले योगदान हे अधिक महत्त्वाचे ठरते. संजय नलावडे साहेबांनी सामाजिक जाणीवेतून आपल्या शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यातील कर्तबगार समाज धुरीणांच्या कार्याविषयी लिहिलेला 'शिवनेरीची श्रीमंती' हा अडतीस व्यक्तिचित्रांचा संग्रह. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या, काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे विस्मृतीत गेलेल्या मान्यवरांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम संजय नलावडे साहेबांनी मोठ्या आनंदाने केलेलं आहे. आपल्या समाजाला उच्च पातळीवर आणण्यासाठी ज्या ज्या समाज धुरीणांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे त्यांचा संजय नलावडे साहेबांनी "शिवनेरीची श्रीमंती" या चरित्र ग्रंथाद्वारे योग्य शब्दांत सर्वानाच परिचय करून दिलेला आहे. संजय नलावडे साहेबांनी या आदरणीय व्यक्तिमत्त्वांचे विविध पैलू, अतिशय सुंदर शैलीने विस्तृतपणे उलगडून समाजापुढे मांडले आहेत.या अडतीस कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा परिचय करून देताना आपली ओघवती लेखनशैली आणि सौंदर्य संपन्न भाषेमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. पुस्तक वाचून नकळत मन त्या काळातील वातावरणात रेंगाळते,वाचक एकदम भाराऊन जातो इतकी ताकद संजय नलावडे साहेबांच्या लिखाणात आहे. मुंबईमध्ये राहूनही आपल्या जन्मभूमीशी नाळ जोडलेली असल्यामुळे आत्मीय भावनेतून संजय नलावडे साहेबांनी हे शिवधनुष्य पेललं आहे. त्यांनी लिहिलेल्या पहिल्याच लेखाची राज्यशासनाच्या मराठी विश्वकोशात नोंद झाली यावरून या लेखनाचं संदर्भमूल्य किती मोठं आहे हे समजतं. ही व्यक्तिचित्रं समाजचित्रं व्हावीत इतकी ती सशक्त आहेत. कारण लेखकाची अभिजात रसिकता, कलात्मकता, विचारप्रवणता, आत्मनिष्ठा या सर्वांचा प्रत्यय ही व्यक्तिचित्रं वाचताना येतो. सहजता हा या सर्व लेखांचा स्थायीभाव आहे. संजय नलावडे साहेबांचे समृद्ध अनुभवविश्व, ओघवती शैली, बांधीव मांडणी, मुद्देसूदपणा, भाषाप्रभुत्व, शब्दवैभव, लेखनाला असलेली शिस्त यामुळे ही सगळीच व्यक्तिचित्रं वाचनीय झाली आहेत. सामाजिक, सांस्कृतिक संदर्भमूल्य असलेला 'शिवनेरीची श्रीमंती' हा व्यक्तिरेखांचा संग्रह अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणूनही उपयोगी पडेल. पायाभूत असे मोठे काम संजय नलावडे साहेबांनी केलं असून 'शिवनेरीची श्रीमंती' या पुस्तकामुळे त्यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटवली आहे. 'शिवनेरीची श्रीमंती' या व्यक्तिचित्रांचा संग्रह लिहीत असताना संजय नलावडे साहेबांनी मोठ्या आस्थेने अभ्यासपूर्वक सविस्तर लिखाण केलेले आहे. संजय नलावडे साहेबांच्या रुपाने आपल्या समाजात एक तरी आपला समाज बांधव आपल्या लोकांच्या कर्तृत्वाची जाण ठेवून आपल्या समाजधूरीणांच्या आठवणी आपल्या लेखणीतून साकारून भावी पिढीला मार्गदर्शक ठरेल असे पवित्र कार्य करीत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. संजय नलावडे साहेबांनी लिहिलेल्या सर्वच लेखांचे वाचन करून मन भरून आले. शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यात घडून गेलेली अशी सामाजिक दैवत फार दुर्मिळ झाली आहेत. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करून नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांच्या पासून मिळणारी ऊर्जा, त्यांच्या समाजाविषयी असलेल्या भावना या सर्वांचे मनोधैर्य वाढविणारे आहे याचा उल्लेख या निमित्ताने करावासा वाटतो. सर्वच लेखांचे शब्दांकन आणि त्यातील भावना संजय नलावडे साहेबांनी अतिशय प्रभावी पणे मांडल्या आहेत, त्याबद्दल साहेबांचे कौतुक वाटते. "शिवनेरीची श्रीमंती" या पुस्तकातून भावी पिढीला नक्कीच बोध मिळू शकतो आणि एक नवी ऊर्जा यानिमित्ताने मिळू शकते. हे पुस्तक सर्वांनी अवश्य वाचावं आणि शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्याचा वाचनीय दस्त ऐवज म्हणून संग्रही ठेवावे असेच आहे. शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यातील समाज मनस्क उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या समाज धुरीणांबद्दल संजय नलावडे साहेबांनी जे लिहिले आहे ते म्हणजे शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्याचा एक सामाजिक इतिहासच आहे, एक ऐतिहासिक दस्त ऐवज आहे. जुन्नर तालुक्यातील ज्या ज्या व्यक्तींनी जीवनाचा अत्यंत संघर्षमय प्रवास करत यशाचे उंच शिखर पादाक्रांत करून जो काही नावलौकिक प्राप्त केलेला आहे, अशा कर्तृत्ववान लोकांच्या कार्याचा आलेख तळागाळातील लोकांना ज्ञात असावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्या त्या कर्तृत्ववान लोकांच्या भूतकाळातील इतिहासाचे मूल्यमापन आणि वर्तमानातील जनहितार्थ सकारात्मक सेवाभावी उपक्रम यांची सांगड घालून आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न आमचे मित्र लेखक श्री.संजय नलावडे साहेबांनी “ शिवनेरीची श्रीमंती" या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. "शिवनेरीची श्रीमंती" ची निर्मिती ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी संजय नलावडे साहेबांची मोठी भेट आहे,म्हणून जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने संजय नलावडे साहेबांचे त्या निमित्ताने मी आभार मानतो आहे. संजय नलावडे साहेबांचे अवीट गोड व्यक्तिमत्त्व त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी निगडीत कार्याचा विस्तारित व्याप सांभाळताना - अनुभवताना आजवरच्या वाटचालीत कधीही त्यांनी अहंकाराचा वारा मनाला स्पर्शू दिला नाही की मोठेपणाची लालसा बाळगली नाही. संयत, मनमिळावू, समंजस स्वभाव, डोळस ध्येय आणि सामंजस्याधारित विचार, समन्वयाला प्राधान्य या संजय नलावडे साहेबांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वाभाविक पैलूंमुळे त्यांच्या यापुढील काळातील उज्वल भवितव्याची खात्री अधिक पटते. शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याच्या या भूमीपुत्राने आपल्या साधेपणा, शांत - मितभाषी, संयत - स्नेहशील स्वभावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संजय नलावडे साहेब, या कलासक्त, दिलखुलास, आनंदी मुशाफिराला दीर्घायुष्य लाभो, याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा.......🌹🌹🌹

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे