Breaking
संपादकीय

|| श्री || ” आकाशवाणी ” म्हणजेच आमच्या भाषेत ” रेडिओ “च्या आवाजाला आज ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच्या दूरदर्शनच्या जमान्यातल्या मंडळींना आकाशवाणीची जादू कळणार नाही . आम्ही काही भाग्यवंतांनी ती जादू अनुभवलीय . २३ जुलै १९२७ ला स्थापन झालेल्या आकाशवाणीने आपल्या भावविश्वात इंद्रधनुष्य फुलवलं. रेडीओच्या त्या दिवसांच्या आठवणी पुन्हा एकदा तुमच्या समोर मांडतोय त्या माझी लहानपणापासून सोबत करणाऱ्या रेडीओच्या छायाचित्रासह .. तुम्हालाही तुमच्या घरातल्या रेडीओच्या खोक्याची नक्कीच आठवण जागी होईल.

दिवस रेडिओचे काल जुन्या घरी सामानाची आवराआवर करताना आमचा जुना रेडिओ दिसला. बंद अवस्थेत असलेlल्या या रेडिओने माझ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या . माझ्या कळत्या वयापासून म्हणजे दुसरी तिसरीच्या वयापासून ते अगदी तारुण्याच्या म्हणजे महाविद्यालयीन दिवसांपर्यंत हा छानपैकी गाणी , बातम्या इतर कार्यक्रम ऐकवायचा. नंतर घरात टेप रेकॉर्डर आल्यानंतर मी याच्या पासून काहीसा दूर झालो. तो पर्यंत हा बराचसा बंद पडत आला होता. न्याशनल एको कंपनीच्या या रेडिओचं आगमन आमच्या घरात साधारण 1990 च्या दरम्यान झालं . म्हणजे माझ्या जन्माच्या जवळजवळ पंधरा वर्षानंतर. आता हा बंद असला तरी माझ्या लहानपणी हा खूप जोशात होता . केंद्रांची ठिकाणे दाखवणाऱ्या जागी छान पिवळा प्रकाश पडायचा आणि वर कोपऱ्यात हिरवा लाईट लागायचा . लाल भडक काडी स्टेशन पकडत फिरायची . लता मंगेशकर , किशोरकुमार , मोहम्मद रफी , आशा भोसले , पासून ते सुलोचना चव्हाण , रोशन सातारकर , प्रल्हाद शिंदे , जयवंत कुलकर्णी , सुरेश वाडकर असे कितीतरी जणांचे सुरीले आवाज याच्या माध्यमातून आमच्या घरी दाखल होत असत. सकाळी सकाळी जाग यायची ती आकाशवाणीच्या त्या चिरपरिचित सिग्नल ट्यून ने . घरचे जागे होऊन कामाला लागलेले असायचे . अंगावरची चादर फेकून मी उत्साहाने आवराआवर करायला लागायचो तो पर्यंत भक्ती संगीत सुरु झालेलं असायचं . सुधीर फडक्यांच्या " कुठे शोधिशी रामेश्वर " पासून ते माणिक वर्मांच्या " अमृताहूनी गोड नाम तुझे देवा " पर्यंत एकसे एक भक्ती गीते कानावर पडायची . त्या तालात चहा , आंघोळ व्हायची . दरम्यान शेतकऱ्यांसाठी बाजार भाव आणि हवामानाचा अंदाज , बाजारपेठेतील आजचे बाजार भाव गंभीर आवाजात कुणीतरी सांगायचं . आवाज काहीसा गावरान गोडवा असलेलाच असायचा . यात निफाड , लासलगाव हि कांद्याची बाजारपेठ असलेली नावं हमखास असायची . . ( पर्वा नगरला गेल्यावर बस स्टण्ड वर या गावांच्या नावाच्या पाट्या बघितल्यावर रेडिओतला तो आवाज आठवला ) बहुतेक सातला पाच मिनिटे कमी असताना संस्कृत बातम्या लागायच्या . बरोब्बर ७ वाजता " आकाश वाणी पुणे , सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे " असे शब्द कानावर पडायचे . कधी बातम्या देणारे भालचंद्र कुलकर्णी असायचे . बातम्या नंतर कधी मराठी चित्रपट संगीत लागायचं आणि अंगात जोश चढायचा . थंडीत आंघोळ आटोपून मी माळवदावर जायचो . मात्र माळवदाच्या बरोब्बर सवन्याखाली रेडिओ असल्याने सगळी गाणी अगदी स्पष्ट कानावर पडायची. कधी लता मंगेशकर " ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे " म्हणत अवतरायच्या तर कधी सुरेश वाडकर " झन झननन छेडिल्या तारा " म्हणत मैफिलीत रंग भरायचे . ८ वाजता सिलोन लावलं जायचं आणि नव्या हिंदी चित्रपट गीतांचा धुमाकूळ घरात सुरु व्हायचा . “ जब छाये मेरा जादू ” म्हणत आशा भोसले यायच्या तर “ प्यार करले घडी दो घडी ” म्हणत नितीन मुकेश यायचे . ९ नंतर रेडिओ काही काळ बंद व्हायचा तो ११ वाजता परत सुरु व्हायचा . कामगारांसाठी या कार्यक्रमाचं विशिष्ठ संगीत कानावर पडलं कि शाळेला जायची वेळ झाली हे लक्षात यायचं . मग लोक संगीतातली ती अवीट गोडीची गीत ऐकत आम्ही शाळेच्या रस्त्याला लागायचो. शाळेच्या रस्त्यात प्रत्येक घरातल्या रेडिओवर लागलेली हि गाणी कानावर पडायचीच . शाहीर साबळे , विठ्ठल उमप , शाहीर पिराजी सरनाईक ,पांडुरंग वनमाळी , विठ्ठल शिंदे , प्रल्हाद शिंदे , उत्तरा केळकर , सुलोचना चव्हाण अश्या मंडळीची गावरान गाणी कानावर पडायची आणि मराठमोळ वातावरण मनात रुंजी घालायचं . " चल ग सखे पंढरीला " , " हे पावलाय देव मला मल्हारी ", " मी डोलकर डोलकर दर्याचा राजा " " विंचू चावला " , " पाडाला पिकलाय आंबा ", " डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस " अशी मराठमोळी गाणी कानावर पडायची . आजही हि गाणी ऐकली कि शाळेची वेळ झाल्याचा भास होतो. दुपारी कधी घरी असलो किंवा रविवारी दुपारी महिलांसाठी , वनिता मंडळ अश्या कार्यक्रमातल्या महिलांच्या चर्चा हि कानावर पडायच्या . रविवारी दुपारी विविध भरतीवर एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या जगण्याची वाटचाल सांगायचे स्वतःच्या गाण्यांसकट . अमीन सयानी बिनाका गीतमाला घेऊन दर बुधवारी दाखल होत . बिनाका गीतमाला रात्री ८ वाजता सुरु व्हायची पण लोक संध्याकाळी ६ पासूनच सिलोन स्टेशन लावून ठेवायचे कारण नंतर स्टेशन मिळालं नाही तर ? रात्री ९ वाजता बिनाका संपल्यावर अजून हा कार्यक्रम संपायला नको होता असं वाटायचं . संध्याकाळी भेदिक , भारुड , गोंधळ अशी लोकगीते कानावर पडायची. आजही अचानक कधीतरी संध्याकाळच्या वेळी हि लोकगीताची गाणी आठवून जातात . रात्री ९ वाजे पर्यंत सिलोन किंवा विविध भारती वरची हिंदी गाणी कानावर पडायची आणि रात्री ९ :३० वाजता आपली आवडचं ते सुखद संगीत कानावर पडायचं . रविवारी हि आपली आवड दुपारी असायची . अंथरुणावर पडल्या पडल्या हि आपली आवड ऐकणे म्हणजे दिवसातला सर्वात सुखाचा काळ . आभाळात मस्त चंद्र आणि चांदण्या दिसायच्या . त्या बघत बघत आम्ही आपली आवड ऐकायचो . " गोमू संगतीनं माझ्या तू येशील का ? " म्हणत हेमंत कुमार अवतरायचे तर कधी " प्रितीच झुळझुळ पाणी " म्हणत शैलेंद्र सिंग आणि उषा मंगेशकर यायचे . " मी रात टाकली मी कात टाकली " म्हणत लता मंगेशकर प्रकट व्हायच्या तर कधी " माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी ? " असे विचारात महेंद्र कपूर धिंगाणा घालायचे . एकंदर या रेडीओच्या माध्यमातून संगीतातले जवळपास सगळे सुवर्ण क्षण मी अनुभवले . अजूनही मी हा रेडिओ जपून ठेवलाय . त्या जुन्या दिवसांची आठवण म्हणून . आता तो बंद आहे . त्याची बटणे मधल्या काळात हरवली . पण अजूनही त्याच्या कडे बघितलं कि वाटत पुन्हा तो बोलायला सुरुवात करेल आणि म्हणेल ..... “ हे आकाशवाणीचं... केंद्र आहे . आता ऐका ..... .... मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे