Breaking
राजकिय

महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील घातक रसायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडू नये!अन्यथा घातक रासायनिक पाणी सोडणारी पाईपलाईन फोडली जाईल!रायगड वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन चे अध्यक्ष नागेश दादा देशमुख यांनी कारखाना मालकांना इशारा दिला.

महाड औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यातील घातक रसायनिक पाणी थेट नदीपात्रात सोडू नये अन्यथा घातक रासायनिक पाणी सोडणारी पाईपलाईन फोडली जाईल !रायगड वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन कारखाना मालकांना इशारा दिला. महाड एमआयडीसी मध्ये असणाऱ्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात घातक रसायने नदीपात्रात डायरेक्ट सोडली जातात.महाड सीईटीपी मंडळाकडून कारखान्यातून सोडलेले पाणी हे फिल्टर केल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात असून.यावर खूप मोठा खर्च केला जातो. परंतु प्रत्यक्षात नदीत सोडलेले पाणी फिल्टर केलेले नसते.अत्यंत घातक रासायनिक पाणी थेट नदीत सोडले जाते. यात खूप मोठा आर्थिक अपहार अधिकारी करत असून. सावित्री नदी पूर्ण दूषित केलेली आहे .पर्यावरण दूषित झाले आहे.अनेकदा नदीतील मासे मृत झालेआहेत.पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना कॅन्सर सारखे रोग होत आहेत.अधिकारी वर्ग त्यांचे खिसे गरम करून घेत आहेत. म्हणून अशा सर्व अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखे कडून झाली पाहिजे.यापुढे थेट नदीपात्रात सीईटीपी पाईपलाईन मधून पाणी सोडू नये.नदीकिनारी छोटा तलाव बांधून तलावात सीईटीपी चे पाणी व मासे सोडून जर मासे जगले तरच तलावातून पाणी नदीपात्रात सोडले जावे.तातडीने कारवाई व्हावी पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास सावित्री नदी दूषित घातक रासायनिक पाणी सोडणारी सीईटीपी ची पाईपलाईन फोडली जाईल.परिणामांची सर्व जबाबदारी महाड औद्योगिक महामंडळाची आणि महाड सीईटीपी प्लांटची असेल.असे पत्र संबंधित विभाग व प्रशासनाला देण्यात आले आहेत.यावेळी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश चंद्रकांत देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष दीपक प्रकाश गायकवाड, जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे, जिल्हा सदस्य निकत तांबट, रिक्षा युनियनचे खजिनदार रुपेश सकपाळ आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज 18 जनमत वृत्तवाहिनी महाड.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे