Breaking
राजकिय

शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार.

शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पावसाळे पाहिलेला आणि मुरब्बी नेते असलेले शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्यादृष्टीने त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचा प्रभावीपणे वापर केला आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांना सोबत घेतले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भूषण सिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील. तसेच भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले होते. मध्यंतरी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता. तेव्हा भूषणसिंह यांनी, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एका विरोधकाला स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी शरद पवार यांनी चंद्रराव तावरे, अनंत थोपटे आणि बारामतीमधील पवार कुटुंबीयाचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्त्वाला तिलांजली दिली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रस्थान ठरत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. यानिमित्ताने मोहिते-पाटील घराण्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोहिते-पाटील घराणे पु्न्हा शरद पवार यांच्यासोबत आल्याने राष्ट्रवादीची माढा आणि सोलापूरच्या राजकारणातील ताकद आणखीन वाढणार आहे.

0 0 3 8 1 4

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे