Breaking
संपादकीय

अनंत अंबानी आणि ईशा अंबानी यांच्या लग्न सोहळ्यामध्ये अंबानी परिवाराने जगाला दिले करून सुसंस्कृत भारताच्या सुसंस्कृत संस्कृतीचे दर्शन…!

बरेच दिवस सर्वत्र अंबानी कुटुंबाची चर्चा होताना दिसतेय, चांगल वाईट आणि अगदी खालच्या दर्जाचे देखिल काही लोक लिहीत आहेत बोलत आहेत त्यामूळे शेवटी न राहवून अंबानी परिवारा वरील संस्काराचे जे निरीक्षण आहे ते मी येथे मांडण्याचा छोटासा प्रयत्न. आजकाल अंबानी परिवार चर्चा मध्ये आहे, तर अंबानी परिवाराबद्दल बोलूया. आपण अनेक वेळा जे लक्षात घेतले, जे आपल्यासारख्या सर्वसाधारण कुटुंबांमध्ये दिसत नाही, पण अंबानी कुटुंबात दिसते, ती एक गोष्ट खरोखरच पाहण्यासारखी आणि शिकण्यासारखी आहे. आपल्याकडे मध्यमवर्गात काय होते? थोडे चार पैसे आले नाही की आपण आपल्या मुलांना आया कडे सोपवतो. लग्न कार्याच्या वेळेस, फिरायला जाताना, शॉपिंगला जाताना "आया" मुलांना सांभाळते. विशेषतः फंक्शनमध्ये तर भारी कपडे, ज्वेलरी घातली की मुलांना हात लावणार नाहीत, कारण मुलांना उचलायला लाज वाटते किंवा त्रास होतो. पण अंबानी परिवारात ईशा असो किंवा श्लोका, त्यांचे पती असोत किंवा मुकेश अंबानी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी दोन दोन मुले त्यांनी एकत्र उचलली आहेत, आणि जुन्या काळासारखे बाजूला कंबरेवर बसवले आहेत. त्यांना ना लाज वाटते, ना ते लोक त्रस्त दिसतात. हे सर्व चोंचले आपल्यासारखे लोकच जास्त करतात. दुसरे म्हणजे, त्यांचे कपडे पहा किंवा भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा मान राखताना त्यांचे रितीरिवाज, त्यांच्या सूनबाई आणि मुलींचे कपडे आणि संस्कार पाहण्यासारखे असतात. दुसरीकडे भारतीय सिनेमा क्षेत्रातील ललना पहा, विचित्र कपडे घालण्याची स्पर्धा लागलेली आहे. अंबानी परिवार खरेच सिद्ध करतो की माणूस जितका जास्त उंच जातो तितका तो जमिनीशी जोडलेला असावा. अंबानी कुटुंब शुद्ध भारतीय संस्कृतीचे पालन करते, म्हणूनच अनेक लोक त्यांचा मत्सर करतात आणि वाईट गोष्टी बोलतात. खरं म्हणजे हे एक उद्योजक कुटुंब आहे, कोणताही उद्योजक असेल तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष देशाचा विकासात भर टाकत असतो. त्यामूळे कित्येक लोकांचे कुटुंबाचा उदर निर्वाह होतो. आणि त्यांना देखील स्वतचं जीवन कसं जगावं याची नक्कीच मुभा आहे असं मला स्पष्ट वाटतं. आपण आजूबाजूला नेहमी बघतो प्रत्येक जन आपल्या लायकी प्रमाणे आपल्या मुलाबाळांचे लग्न समारंभ किंवा घरगुती कार्यक्रम करत असतो त्यामध्ये तर सहसा उधळपट्टी जास्त तेच करताना दिसतात ज्यांचा काळा पैसा असेल. पण ज्यावेळेस हे कुटुंब स्वताच्या घरातील आनंद साजरा करत आहेत तर त्यांना विरोध फक्तं यासाठी होतो आहे आणि त्याच्या विरोधी वातावरण निर्मिती यासाठी केली जात आहे कारण ते पूर्णपणे सनातन संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचे पालन करत आहेत. आणि त्याचा जागतिक स्तरावर प्रसार देखिल करत आहेत पण काही लोकांना तेच खुपत आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे म्हटलं आहे ते उगीच नाही.स्वर्गीय धीरूभाई अंबानी यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास करून मुलांना सुसंस्कार देऊन अंबानी परिवाराने खरोखर भारत मातेचे नाव साता समुद्रापलीकडे नेऊन ठेवले आहे. कित्येक भारतीय बेरोजगार युवकांना, युवतींना क्लास वन जीवन यांच्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून मिळत आहे .भारतीय संस्कृतीची आन बाण आणि शान ठेवून हा परिवार भारत किती संस्कृत देश आहे हे जागतिक पटलावर दाखवण्याचा प्रयत्न करा आहे.सुपरिचित विदेशी नृत्यांगना तिने भारताबद्दल अनापशनाप जे उद्गार काढले तिला करोडो रुपये देऊन तिची घमेंड तोडून भारत देश देखील कुठे कमी नाही हे अंबानींनी दाखवून दिले.अंबानी परिवारातील यंग जनरेशन सुद्धा आपल्या संसाराची चुणूक दाखवून देताना जे सर्व सामान्य लोकांना करायची लाज वाटते ते म्हणजे आशीर्वाद घेताना पायाला हात लावून आशीर्वाद घेणे अशा अनेक कृत्यातून त्यांची संस्कृती दिसून येते.तसेच प्राणीमात्रावर आणि वृक्षवेलींवर सुद्धा अंबानी परिवार प्रेम करताना दिसते.एखाद्या कुटुंबाचे मूल्यमापन करताना त्याच्या दोन्ही बाजू न बघता वास्तविक मत मांडणे हे मला वाटतं चुकीच आहे.प्रत्येक भारतीयाला या परिवाराचा गर्वच नाही तर अभिमान सुद्धा पाहिजे .अंबानी परिवार आप जिओ हजारो साल.

0 0 3 8 1 4
5/5 - (1 vote)

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे