कृषीवार्ता
जुन्नर तालुक्यामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
जुन्नर तालुक्यात बिबट_आणि_मानव_संघर्ष दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. बिबट्यांचे माणसांवर होणारे हल्ले आणि त्याचं वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. तालुक्यामध्ये सर्वत्र बिबट्या दिसणे फारच कॉमन झाले आहे. काही दिवसांपूर्वी उंब्रज, #बोरी, आळे आदी ठिकाणी बिबट हल्ल्याच्या घटना घडल्या आहे. मानवी वस्तीत बिबट्यांचे हल्ले आणि वास्तव्य वाढत चालले आहे. शेती, वाडी, वस्तीच्या भागात राहणारे शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकरी आपल्या लहान मुलांनाही शाळेत पाठवण्यास धजावत आहेत. चार वर्षांपासून पारनेर तालुक्यातील धोत्रे येथील संजय मोहन कोळेकर हे शिरोली_खुर्द परिसरात उदरनिर्वाह करण्यासाठी येत असतात. येथील संपत केरू मोरे यांच्या शेतावर ह्या धनगराचा_वाडा होता. त्याठिकाणी पहाटे च्या दरम्यान बिबट्याने संस्कृती_संजय_कोळेकर ह्या दीड वर्षाच्या मुलीला ऊसाच्या शेतात नेले आणि ठार केले. सदर घटनेची माहिती समजताच वनविभाग व पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वनविभागाला लवकरात लवकर हा नरभक्षक बिबट्या जेरबंद होण्यासाठी ड्रोन, पेट्रोलिंग, पिंजरे तात्काळ लावून. स्थळ पंचनामा करून ह्या कोळेकर परिवाराला आर्थिक मदत लवकरात लवकर कशी मिळेल व तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा लाईट उपलब्ध करून दिली गेली पाहिजे तसेच बिबट्यांना पकडुन त्यांची नसबंदी करण्यासंबंधित शासन दरबारी प्रस्ताव कुठपर्यंत आहे त्याची माहिती झाली पाहिजे. ह्या बिबट्यांचा कायमचा बंदोबस्त झाला नाही तर भविष्यात शेतकरी बांधवांसोबत शासन व वनविभागाविरोधात मोठा संघर्ष उभा राहू शकतो. सदरच्या प्रश्नाकडे DYSP चौधरी साहेब, चव्हाण साहेब, RFO काकडे साहेब, वन व पोलिस विभागातील कर्मचारी, रेस्क्यू टीम, यांनी सकारात्मक भूमिका घेऊन सरकार दरबारी हा प्रश्न उपस्थित करून जनतेला भयमुक्त करावे.
![](https://news18janmat.com/storage/2024/04/Screenshot_2024_0411_110522-2-481x470.jpg)
0
0
3
8
1
4
![](https://news18janmat.com/storage/2024/04/Screenshot_2024_0411_110522-2-289x300.jpg)
0
0
3
8
1
4