Breaking
देश-विदेश

*आज १० एप्रिल* *आज पत्रकारितेतील ऑस्केर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या #जोसेफ_पुलित्जर यांचा जन्मदिन.*

*आज १० एप्रिल* *आज पत्रकारितेतील ऑस्केर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या #जोसेफ_पुलित्जर यांचा जन्मदिन.* जन्म. १० एप्रिल १८४७ हंगेरी येथे. पुलित्झर हे अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. जोसेफ पुलित्झर यांचे नाव पत्रकारितेच्या जगात मोठ्या आदराने घेतले जाते. १८६४ मध्ये जेव्हा ते हंगेरीहून अमेरिकेत आले तेव्हा त्यांच्याकडे ना पैसा होता, ना ओळख आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना इंग्रजी बोलणे देखील जमत नव्हते. त्यांनी एकेकाळी वेटर म्हणून काम केले होते. यानंतर त्यांना अमेरिकेतील सेंट लुईस येथील जर्मन भाषेतील वृत्तपत्रात नोकरी मिळाली. वर्षभरातच ते पत्रकारावरून व्यवस्थापकीय संपादक बनले.१८७८ मध्ये त्यांनी सेंट लुई पोस्ट डिस्पॅच आणि पाच वर्षांनंतर न्यूयॉर्क वर्ल्ड वृत्तपत्र सुरू केले. ही दोन्ही वृत्तपत्रे उत्कृष्ट पत्रकारितेची उदाहरणे मानली गेली. जोसेफ पुलित्झर हे डेमोक्रॅटिक पक्षाचाही प्रमुख चेहरा राहिले होते. न्यूयॉर्क मधून निवडणूक जिंकून ते अमेरिकन काँग्रेसमध्येही पोहोचले. एकेकाळी त्यांनी अमेरिकेतील बडे उद्योगपती आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आघाडी उघडली होती.जोसेफ पुलित्झर यांनी जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जिवंत ठेवण्यास मदत केली. त्यांनी आपल्या कमाईतून एक दशलक्ष डॉलर्स स्कूल ऑफ जर्नलिझमसाठी कोलंबिया विद्यापीठाला दिले. १९१७ मध्ये, कोलंबिया विद्यापीठाने पुलित्झर पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. पत्रकारितेतील ऑस्किर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार हा पहिल्यांदा १९१७ मध्ये देण्यात आला. हा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कारही मानला जातो. पुलित्झर पुरस्कार २१ श्रेणींमध्ये दिला जातो. प्रत्येक श्रेणीतील विजेत्याला $15,000 रोख दिले जातात. २०१७ मध्ये, ही बक्षीस रक्कम $10,000 होती. सार्वजनिक सेवा श्रेणीतील विजेत्याला सुवर्णपदक दिले जाते. जोसेफ पुलित्झर यांच्या इच्छेमुळे पुरस्कार सुरू करण्यात आला होता. त्यांनी त्यांच्या मृत्युपत्रात हा पुरस्कार सुरू करण्यास लिहिले होते. पुलित्झर यांचे २९ ऑक्टोबर १९११ रोजी निधन झाले.

0 0 3 8 1 4
*आज १० एप्रिल*
*आज पत्रकारितेतील ऑस्केर समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो त्या #जोसेफ_पुलित्जर यांचा जन्मदिन.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News 18 जनमत

*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏 पत्रकार म्हणजे कोण? १) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते. २) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. ३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. ४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. ६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते. ७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. ८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते. ९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते. १०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते. वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे