ब्रेकिंग
News 18 जनमत
*पत्रकार म्हणजे काय, ते वाचण्यासाठी दोन मिनिटे घ्या*🙏🙏
पत्रकार म्हणजे कोण?
१) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता भासते.
२) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते.
३) जेव्हा एखादा लेखापाल, मुख्यअधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते.
४) जेव्हा आपण एखाद्या राजकारणी, अधिकारी, ख्यातनाम व्यक्ती, पीडित व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
५) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्यासाठी लढा उभारतो, तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
६) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलांने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची गरज पडते.
७) जेव्हा आपण शेती करता, काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
८) घरी बसून संपूर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराची आवश्यकता असते.
९) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यक्ता असते.
१०) जेव्हा एखादी घटना – दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.
वरील प्रश्नांची उत्तरे स्वतःला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. पत्रकार , दिवस – रात्र, उन्हाळा /पावसाळा / हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून झटत असतो. प्रसंगी वाईटपणा घेतो पण न्याय हक्कासाठी लढत असतो. तो खरा पत्रकार
वरिष्ठ पत्रकार श्री सतीश नलावडे
न्यूज 18 जनमत टीव्ही न्यूज चैयनल.
Read Next
6 days ago
वसई : माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी विरारच्या निवृत्त तलाठ्याला २५ हजारांचा दंड सुनावण्यात आला आहे. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने हा आदेश दिला. तक्रारदाराला पुढील १५ दिवसात निशुल्क माहिती पुरविण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.
2 weeks ago
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं पुणे सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई.
09/10/2024
आणखी एक निष्पाप बळी ओतूर परिसरामध्ये नागरिकांवर होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण.
08/09/2024
बदलापूर ते पनवेल या सुमारे सव्वाचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम या मुदतीआधीच पंधरा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. वडोदरा जेएनपीटी महामार्गावरील हा एक महत्वाचा टप्पा असून या महामार्गाचे काम पूर्ण.
27/08/2024
मुक्काम पोस्ट तारुख तालुका कराड येथील ग्रामस्थांनी माझी कर्नल महादेव लक्ष्मण काटेकर तसेच पंचक्रोशीतील आजी-माजी सैनिक आणि पोलिस दलातील अधिकारी यांचा 15 ऑगस्ट चे औचित्य साधून केला मोठा जल्लोष पूर्ण सत्कार समारंभ साजरा.
16/08/2024
महाराष्ट्राचे कुलदैवत ज्योतिबा हे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला केदारनाथ आणि वाडी रत्नागिरी असे देखील म्हटले जाते.नुकत्याच झालेल्या श्रावण महिन्यातील षष्ठी यात्रेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून भावपूर्ण वातावरणामध्ये आरती व प्रसादाचा लाभ घेऊन गुलाल उधळून ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दर्शन घेतलं.
12/08/2024
रायगड स्थानिक आमदार स्थानिक खासदार उघडा डोळे पहा नीट!
10/08/2024
मुंबई महानगरपालिकेच्या कल्पवृक्षावर वाढत आहेत भ्रष्टाचाराची बांडगुळे.
25/07/2024
पुणे बेंगलोर नॅशनल हायवे, कराड कोल्हापूर नाक्यावरील रस्त्यावर नॅशनल हायवे प्राधिकरणातील काही भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या झालेल्या भ्रष्टाचाराच्या संगणमातामुळे पडलेल्या खड्ड्यांच्या रूपामध्ये अवतरले यमदूत !आणि म्हणून कर्तव्यदक्ष वाहतूक पोलीस वाहन चालकांसाठी बनले आहेत जणूकाही देवदूत!
20/07/2024
दिनांक : १९ जुलै २०२४ रोजी वंचित बहुजन माथाडी व जनरल कामगार ट्रान्सपोर्ट युनियन रायगड जिल्हाध्यक्ष : श्री. नागेश देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये रायगड जिल्ह्यातील आदयोगिक क्षेत्रात (एम.आय.डी.सी) क्षेत्रात थर्ड पार्टी कंत्राट पध्दती विरोधात १५ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर जाहिर उपोषणाचा दिला इशारा!
Related Articles
एम पश्चिम विभाग कार्यालयांतर्गत अतिक्रमण आणि अनाधिकृत बांधकामांबद्दलच्या धुळखात पडलेल्या हजारो तक्रार अर्जांना जबाबदार कोण? आणि अशा अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळणारे मालक व ठेकेदार यांच्यावर वरदहस्त कोणाचा?
19/07/2024
मुंबई महानगरपालिके मार्फत मान्सून पूर्व नालेसफाईला मिळणाऱ्या निधीचा महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने होतो आहे मोठा भ्रष्टाचार.
18/07/2024